मुंबई- विधान परिषदेचे माजी सभापती आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी प्रदीर्घ आजारानं अखेरचा श्वास घेतला. शिवाजीराव देशमुख हे किडनीच्या आजारानं त्रस्त होते. त्यांच्यावर महिन्याभर उपचार सुरू होते. बॉम्बे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवाजीराव देशमुख यांचा 1 सप्टेंबर 1935मध्ये जन्म झाला होता. 1996 ते 2002 या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापतीपद भूषवलं होते. सांगलीतल्या कोकरुड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
काँग्रेस पक्षाला सातत्यानं त्यांचं मार्गदर्शन लाभत होतं. काँग्रेस पक्षाची फार मोठी हानी झाली आहे. 1987मध्ये आमदार असल्यापासून आम्ही त्यांना पाहतोय. त्यांच्या कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे, काँग्रेसचे मार्गदर्शक हरवल्याची भावना काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें