सोनपेठ ( प्रतिनिधी ) सोनपेठ येथील जन-सेवा मित्र मंडळाच्या वतिने जिल्ह्यात व पर जिल्ह्याच्या ठिकाणी थेट बसेस सुरू करण्यासाठी वाहतुक नियंत्रण सोनपेठ मार्फत मा.जिल्हाधिकारी परभणी, विभागीय नियंत्रण महामंडळ परभणी, मा.तहसिलदार सोनपेठ पाथरी मतदारसंघ आमदार व पोलिस स्टेशन सोनपेठ यांना निवेदन देण्यात आले. . .सोनपेठ तालुक्यातुन परभणी जिल्ह्यात व पर जिल्ह्यात जनतेला येन्या - जाण्यासाठी एकही थेट बस सुरू नसल्यामुळे तालुक्यातील जनतेने अनेक वेळेस संबंधित असलेल्या कार्यलयास निवेदन दिले पण या जनतेच्या अतिमहत्वाच्या प्रश्ना वरती या कार्यालकडून मनमानी कारभार चालवुन सतत या मागणी कडे जाणुनबुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे तरी विभागीय नियंत्रण परभणी यांनी सोनपेठ ते परभणी व परभणी ते सोनपेठ या दोन्ही बाजुने थेट बस या सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजता या वेळेस बसच्या चार फेऱ्या तत्काळ सुरू कराव्यात व तसेच काही वर्षा पुर्वी बंद करण्यात आलेल्या सोनपेठ हुन औरंगाबाद, नांदेड,पंढरपूर,बिड,पुणे,धारूर,परभणी - मुदगल मार्ग सोनपेठ,सेलु मार्ग जिंतुर, अंबाजोगाई, लातुर,कंधार या बसेस सुरू करणे ,सोनपेठ ते गंगाखेड पाथरी दर तासाला बस सुरू करणे, सोनपेठ हा गंगाखेड आगारातुन तोडून पाथरी किंवा परभणी आगाराला जोडने, मानव विकासच्या पुर्ण गाड्या सुरू करणे, शहरातील मुख्य ठिकाणी चढ -उतार थांबा सुरू करणे या वरिल मागण्याची तत्काळ दखल घेण्यात यावे अन्यथा जन-सेवा मित्र मंडळ सोनपेठच्या वतिने सोनपेठ बसस्थानकाच्या गेट समोर लोकशाही मार्गाने दिनांक २२/१/२०१८रोजी उपोषणास बसणार आहोत असे निवेदन वाहतुक नियंत्रण सोनपेठ मार्फत संबंधित असलेल्या सर्व कार्लयास निवेदन देण्यात आले. निवेदनावर जन-सेवेचे अध्यक्ष साजेद खुरेशी,जुबेर मूल्ला,शेख सलमान,शेख छोटन,शेख सदाम,शेख सुलेमान,वाजेद खुरेशी,शेख फोरोज,अशफाक अन्सारी,अविनाश राठोड,विनोद चव्हाण,शेख जमीर,शेख जुनेद,अनिल राठोड,महेश पाटील,जाधव यासह अदीचे स्वाक्ष-या आहेत.
सोमवार, 14 जनवरी 2019
जन- सेवा मित्र मंडळाने थेट बस सुरू करण्यासाठी परिवहन महामंडळाला दिला उपोषणाचा इशारा.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें