भोकरदन प्रतिनिधी : शहरात सोमवार पासून अवैध वाहन चालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.पोलिसांनी सोमवारी मोटार वाहन कायद्याची पायमल्ली करणाऱ्या वाहन चालकांना दंडित केले. अनेक दिवसांपासून शहरात अवैध वाहतुकीने पादचाऱ्यांना अडचण निर्माण झाली होती शहरात शिवाजी चौक बसस्थानका समोर आंबेडकर चौक पोलीस ठाण्या समोर आशा अनेक ठिकाणी अवैध वाहतूक धारकांची मनमानीला पदाचाऱ्यांची डोकेदुखी वाढली होती पोलिसांच्या या कारवाई मूळे शहरात अवैध वाहतूक चालकांचे धाबे दणाणले होते.अवैध वाहतूक करणारे ५५ अपेरिक्षा व इतर वाहनामुळे पोलीस ठाणे गच्च भरले होते . सदरील अवैध वाहतूक करणारे वाहनांच्या कागदपत्राची तपासणी करून एकूण १४६०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. काहींना दंडात्मक कार्यवाही साठी भोकरदन न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईने चर्चेला उधाण आले होते.या कारवाईने स्वागत होत आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये ,पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे, पोलीस उपनिरीक्षक वैशाली पवार,अमन सिरसाट,एसआय लक्ष्मण चौधरी, सुभाष बरडे, पोना/रुस्तुम जैवळ, नामदेव जाधव, मारोती शिवरकर,पोकॉ/अनंत भुतेकर, संजय क्षीरसागर ,अरुण वाघ,गणेश निकम,अभिजित वायकोस,निलेश फुसे चालक सूर्यवंशी यांनी पार पाडली. सदरची मोहीम यापुढे तिर्व करण्यात येईल सर्व वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें