ट्रामा केअर सुरु न झाल्यास प्राजासत्ताक दिनाच्या दिवशी उपोषणाचा इशारा.
सिल्लोड प्रतिनिधी-सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय येथील ट्रामा केअर यूनिट सुरु करण्यात यावे व रुग्नालयातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी निवृत्ति गायकवाड़ यांच्याकडे एम आय एम जिल्हा उपाध्यक्ष शेख मुख्तार यांनी सादर केले.मागणी पूर्ण न झाल्यासप्रजासत्ताक दिनाच्या दिवशी उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
सिल्लोड शहरात असलेले उपजिल्हा रुग्णालय हे सध्या कोमात गेले असून हे रुग्णालय म्हणजे समस्यांचे माहेरघर बनले आहे. यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचा आजार काही बरा व्हायचे नाव घेत नाही.येथील ट्रामा केअर यूनिट चे उद्घाटन होऊन दोन वर्ष उलटले तरी नागरिकांच्या सेवेत उपलब्ध नाही.यामुळे अॅक्सिडेंट पेशंटचे हाल होत असून अनेकांना ही सुविधा कार्यन्वित न झाल्याने प्राणाला मुकावे लागले आहे. रुग्नालयातील डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यात आलेली नाही.इतकी गंभीर समस्या असून देखील सम्बंधित प्रशासन अद्यापही तोंडावर बोट ठेऊन आहे.यामुळे रुग्णांची हेडसांड होत आहे.सिल्लोड तालुक्याची व्याप्ती मोठी असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना प्राथमिक उपचार करून औरंगाबाद येथे हलविन्यात येते किंवा खाजगी दवाखान्यात रुग्णांना उपचार करावा लागतो.यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक,मानसिक,शारीरिक त्रासाला रुग्णांना सामोरे जावे लागत आहे.सध्या उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर यूनिट शोभेची वास्तु बनली आहे.लवकरात लवकर ट्रामा केअर यूनिट सुरु करण्यात यावे अशी मागणी एम आय एम जिल्हा उपाध्यक्ष शेख मुख्तार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.लवकरात लवकर ट्रामा केअर यूनिट सुरु न केल्यास व रिक्त पदे न भरल्यास प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर एम आय एम जिल्हा उपाध्यक्ष शेख मुख्तार,युवा तालुकाध्यक्ष अनवर पठान,युवक शहराध्यक्ष फहीम पठान,विधानसभाध्यक्ष शेख रफीक,शमीम रझवि,अशोक सोनवणे यांच्या सह्या आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें