सेलू प्रतिनिधी
सेलू : शिक्षकांनी विद्यार्थ्यांची चेतना जागृत करून त्यांच्या जाणीवा वृद्धींगत कराव्यात. नवसमाजाच्या निर्माणासाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सृजनशील करावे. असे प्रतिपादन हिंगोली येथील कवी अण्णासाहेब जगताप यांनी केले. ते नूतन विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात मंगळवार (ता.२२) रोजी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया हे होते.तर व्यासपीठावर नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहाणी,कार्यकारिणी सदस्य दत्तराव पावडे,किशोर मालाणी,पालक शिक्षक संघाचे उपाअध्यक्ष कैलास पोटे पर्यवेक्षक रामकिशन मखमले यांची उपस्थिती होती. पुढे आपल्या भाषणात अण्णासाहेब जगताप म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थी हा विचारशील,कृतीशील आणि उपक्रमशिल झाला पाहिजे. दुष्काळाचा सामना शिक्षक ताकदीनिशी करू शकतात.तेव्हा शिक्षकांनी पर्यावरण संवर्धनात योगदान देणारी पिढी घडवावी. प्रत्येक विद्यार्थ्यांनी तीस झाडे लावून त्यांची जोपासना केली पाहिजे. शेतकरी हिताच्या झेंडूची फुले आणि शेतकरी बाजार या चळवळीच्या माध्यमातून आपल्या स्वतःलाच कशी सकारात्मक ऊर्जा मिळते हे अण्णासाहेब जगताप यांनी विद्यार्थ्यांना अनुभव कथनातून सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. त्यांनी बोधपर कथा,त्यांच्या कविताही ऐकवल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी यांनी केले. शायलेय वार्षिक अहवालाचे वाचन उपमुख्याध्यापक अशोक गाजरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सुरेश हिवाळे यांनी करून दिला.गीत मंचाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले.कार्यक्रमाचे सुञसंचालन श्रेया शिंदे आणि यश जाधव या विद्यार्थ्यांनी केले.तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक मा.मा.सुर्वे यांनी केले. संतोष पाटील,गणेश माळवे,सतीश नावाडे,काशिनाथ पल्लेवाड, नंदकुमार बंगाळे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
सेलू : येथील नूतन विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या समारोप प्रसंगी बोलतांना अण्णासाहेब जगताप मंचावर डॉ.एस.एम.लोया,जयप्रकाश बिहाणी,किशोर मालाणी,दत्तराव पावडे,अनिल कुलकर्णी आदी

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें