भांबळे यांच्या वक्तव्याचा राम खराबे यांनी केला तीव्र शब्दात निषेध. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 24 जनवरी 2019

भांबळे यांच्या वक्तव्याचा राम खराबे यांनी केला तीव्र शब्दात निषेध.

भांबळे यांना  खासदार की  लढवण्याचे ही आव्हान.



सेलू प्रतिनिधी

जिंतूर येथील एका  कार्यक्रमाच्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजय भांबळे यांनी शिवसेनेचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्याबद्दल जे वक्तव्य केले त्या वक्तव्याचा तीव्र निषेध जिल्हा परिषदेचे गटनेते तथा जिंतूर सेलू विधानसभेचे प्रमुख राम खराबे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला असून भांबळे यांनी खासदार की लढवावी आम्ही त्यांना सज्ज आहोत असे आवाहन त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
शिवसेनेचे खासदार बंडु जाधव हे अत्यंत निष्क्रिय खासदार असून आजपर्यंत त्यांनी जिल्ह्याच्या विकासाकरिता कुठलेच कार्य केलेले नसून याबाबत लोकसभेत ते एक अक्षरेही  बोललेले नाहीत असे वक्तव्य जिंतूर येथील एका कार्यक्रमाच्या प्रसंगी भांबळे यांनी केले होते मात्र भांबळे केवळ गुत्तेदारी च्या मागे असून आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना कामे मिळवून देणे आदी महत्त्वाची कामे ते करतात याप्रसंगी भांबळे यांनी केलेले सर्व आरोप निराधार असून सेलू जिंतूर विधानसभा प्रमुख या नात्याने मी तीव्र शब्दात निषेध व धिक्कार करतो असेही दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे यावेळी त्यांनी म्हटले आहे की 9 .12.  2015 रोजी संसदेत मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी केंद्र सरकारने खंबीर उभे राहावे अशी सूचना केली होती परंतु राष्ट्रवादीच्या आमदारांनी सेलू जिंतूर मतदारसंघातील काही स्वस्त धान्य दुकानदार यांनी त्यांच्या पक्षाची कामे न केल्यामुळे त्यांच्यावर आमदारकीचा प्रभाव टाकून स्वतः तक्रार करून स्वस्त धान्य दुकान निलंबित करण्यात आलेली आहेत विकासाच्या कामात अडथळे निर्माण करण्यात आलेले आहेत कर्तव्यदक्ष अधिकारी थांबत नाही म्हणून सर्वसामान्य जनतेची कामे खोळंबतात वालूर शहराला पाणीपुरवठा करणारी भारत निर्माण योजनाचे  रुपये 23 कोटी आमदार मुळेच परत गेलेले आहेत या कामाची गुत्तेदारी मर्जीतील गुत्तेदारांला द्यावयाची होती काम मिळाले नाही म्हणून खोडा घालून शहरातील पंधरा हजार लोकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप आमदार भांबळे यांनी केलेले आहे आदी विविध विकास कामाकरता खासदार बंडु जाधव यांनी कामे केलेली आहेत त्यामुळे त्यांनी असे बिनबुडाचे आरोप केलेले असून शिवसेनेच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असून भाबळे यांना एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी खासदार की लढवावी आम्ही त्यांना लावण्याकरता तयार आहोत असे आवाहनही त्यांनी दिलेल्या पत्रकातून केले आहे याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख रंजीत गजमल महिला जिल्हा संघटक मंगलाताई कथले रमेश भाऊ डक विठ्ठल राव कारके महाराज सेलू तालुका उपप्रमुख शत्रगुण मगर रामेश्वर गोविंद सोळंके जिजाभाऊ सोळंके वाघमोडे सर्कल प्रमुख जीवन चव्हाण सुभाष बॉम्बे अनिल रोडगे सुभाष गायकवाड लक्ष्मण काळे पांडुरंग कावळे मनीष कदम संदीप लहाने गोपाळ कदम सुधाकर पवार आदींची नावे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें