जिंतूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने परिवर्तन निर्धार सभेचे आयोजन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 24 जनवरी 2019

जिंतूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने परिवर्तन निर्धार सभेचे आयोजन.

या सभेला मात्र नागरिकांनी अनुपस्थिती दाखवून विरोध केला असल्याची चर्चा आहे_ 



जिंतुर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नेहमीच राज्य शासनावर शेतकऱ्यांची बाजू घेत दुष्काळाची भाषा करत शेतकऱ्यांमध्ये क्यू व्यक्त करण्यात येते. आणि दुष्काळात निर्धार परिवर्तन यात्रेच्या पक्षाच्यावतीने आयोजन करण्यात आले यानिमित्ताने जिंतूर गंगाखेड घनसावंगी या मतदारसंघातील तालुक्यांमध्ये सभांचे आयोजन देखील करण्यात आले.
या माध्यमातून मतदारांकडे परिवर्तनाची भाषा करण्यात येत आहे परंतु पक्षातील नेत्यांना निवडणुकीच्या तोंडावर आणि सभांच्या वेळी दुष्काळाचा विसर पडला की काय? अशी परिस्थिती सभांच्या माध्यमातून व सभेच्या गर्दीवरून दिसून येत आहे काल झालेल्या सभेत सभामंडपात रिकामा दिसत आहे.
कारण दुष्काळाची भाषा करणारे नेते आणि जिल्ह्यातील लोकसभेसाठी आपणच सक्षम उमेदवार आहोत हे दाखवून देण्यासाठी प्रचंड प्रमाणात जाहिरातबाजी करण्याच्या नादात लाखो रुपयांची उधळण करत आहे.
         जिंतुर शहरात मंठा व परभणी रोडवर लाखो रुपयांचा चुरडा करत होर्डिंग उभे करण्यात आले आहे.
         दुष्काळी परिस्थितीत राज्यशासनावर असुड ओढणारे विरोधक  बॅनरबाजीवर अशी उधळणपट्टी करत लाखो रुपयांचा खर्च करत असुन अश्या समान मुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार? अशी चर्चा गावात सुरू होती.
 परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या परिवर्तन निर्धार मेळाव्यात जिंतूर सेलू चे आमदार विजय भांबळे यांनी भरसभेत खासदार संजय जाधव यांच्यावर टीका करताना जाहीर आवाहन केले होते की, परभणी चे विद्यमान खासदार संजय जाधव यांनी परभणी जिल्ह्याच्या विकासा संदर्भात  लोकसभा सभागृहात गेल्या साडेचार वर्षात एक शब्द ही बोललेला नाही,  जर आपणा कडे त्याचा व्हिडिओ असला तर तो मला आणून दाखवा ज्यांच्याकडे असेल त्यांना मी स्वतः पाच लाख रुपयांचे बक्षीस देईल, राज्यातील सर्वात निष्क्रीय खासदार म्हणून खासदार जाधव यांची नोंद आहे त्याचा पुरावा दैनिक लोकसत्ता वर्तमान पत्राच्या कात्रणाचा दाखला देखील आपल्या कडे असल्याचे आमदार भांबळे यांनी बोलून दाखवले होते.
आमदार भांबळेंनी पाच लाखाचा शब्द पाळावा-प्रताप देशमुख.आज जिंतूर चे माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी आमदार भांबळे यांच्या या विधानावर आक्षेप घेत खासदार संजय जाधव यांच्या संसद सभागृहात केलेल्या भाषणाचा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचे सांगून आज एका पत्रकार परिषदेत त्याचा व्हिडिओ सर्व पत्रकारांना दाखवला आहे. खासदार जाधव यांनी संसदेत आजवर एकेविस वेळा डिबेट केली असून, तब्बल दोनशे एकसष्ट प्रश्न विचारले असल्याची खात्रीशीर माहिती आपल्याकडे उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. आपण शिवसेनेचे समर्थक नसून जिंतूरचा एक नागरिक म्हणून माध्यमांपुढे आपली भूमिका मांडत असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे.
त्यामुळे आमदार भांबळे यांनी पाच लाखाचे बक्षीस मला न देता जिंतूर सेलू तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्न कार्यावर खर्च करावेत असा सल्लाही प्रताप देशमुख यांनी दिला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें