सेलू,दि .१६ /प्रतिनिधी :
भळवणी(जि.अहमदनगर) येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मुर्तीची विटंबना झाली असून या घटनेचा सेलूत बुधवारी (दि.१६)निषेध व्यक्त करुन दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी या बाबत तहसील कार्यालयातर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
सर्व समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मुर्तीची समाज कंटकाने विटंबन केल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या असुन या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात असुन प्रशासनाने तात्काळ संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीचे निवेदन नायबतहसीलदार श्री प्रशांत थारकर यांना समाज बांधवांनी निवेदन दिले.
निवेदनावर दादाराव घुगे,गणेश मुंढे, माऊली घुगे, पी.डी.घुगे, गणेश घुले, खुशाल घुले,डिगंबर बुधवंत,भगवान घोळवे,रावसाहेब मुसळे,अरुण मुसळे,विष्णू गुठ्ठे,संजय मुंडे,श्री नागरे ,आशोक घुगे,विष्णू बुधवंत,संदिप घुगे,विठ्ठलराव बुधवंत,अरुण घुगे,यांच्यासह छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष दगडोबा जोगदंड यांच्या स्वाक्षरी आहेत.
सेलू : राष्ट्रसंत भगवान बाबा मुर्ती विटंबन प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी या बाबत नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या मार्फत प्रशासनास समाज बांधवांनी निवेदन दिले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें