सोनपेठ केंद्रीय कन्या शाळेत आनंदनगरीचे कार्यक्रम संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 25 जनवरी 2019

सोनपेठ केंद्रीय कन्या शाळेत आनंदनगरीचे कार्यक्रम संपन्न.

                                     
सोनपेठ / मंजुर मुल्ला
सोनपेठ शहरातील केंद्रीय कन्या शाळा या ठिकाणी दि.25 जानेवारी 2019 शुक्रवार रोजी मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन करून आनंदनगरी संपन्न झाली या आनंदनगरीत सर्व मुल व मुलींचा उत्साह द्विगुणीत दिसून आला तर पालकांनी हि मुल व मुलीना आनंदनगरी साठी छोटासा व्यवसाय कसा उभा करायचा याचे बाळकडू प्रत्यक्ष सोबत राहून त्या व्यवसायात येणाऱ्या अडचणीवर मात कशी करायची या प्रमाणे तयारी दिसून आली अनेकांनी विद्यार्थीयांने गोळ्या-बिस्कीट पासून भेळ, सामोसा, पाणीपुरी, चणे, पोहे, डोसा, इटली-सांबर, खिचडी, पाणी पाऊच, पाणी जारचे तसेच मुरमुरा चिवडा अनंत खाद्य पदार्थ पालकांनी घरात बनवलेली तसेच रेडीमेड देखील विक्रीसाठी आणलेली दिसून आली तर दुसरीकडे पालकांनी त्यांच्या मित्र अधिकारी आणि सर्व शिक्षक व शिक्षिकेनी देखील सर्व मुल-मुलीना प्रोत्साहन देत आनंदनगरी मध्ये स्वतःच्या पैशायाने खरेदी करून आस्वाद घेतला काही-काही खमंग पदार्थ पाहता-पाहता संपली देखील अशी आनंदनगरी दिवस भर चालावी परंतु तीन तासात आनंदनगरी समाप्त झाली विशेष म्हणजे सर्व मुल-मुली आपण आणलेला पदार्थ समाप्त झाला याचीच चर्चा करत असताना दिसले तर विशेष दिव्यांग असलेल्या मुलांना शिक्षक व पालकांनी झुकते माप देत त्यांनी आणलेल्या पदार्थाचा खरेदी करत खरा स्वाद घेवून आनंदनगरी चा खरा आनंद घेतला या साठी केंद्रीय कन्या शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड केंद्र प्रमुख गणपत कोटलवार, सर्वच शाळेतील शिक्षक,शिक्षिका गट साधन केंद्राचे सर्व कर्मचारी वर्ग शालेय व्यावासाथापन समिती अध्यक्ष किरन स्वामी, सर्व सदस्य, सदस्या आणि पालकांनी सहभाग नोंदउन आनंद घेतला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें