सेलूत भव्यरँलिव्दारे पालिकेच्या कर्मचा-यांनी दिला स्वच्छतेचा संदेश. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 14 जनवरी 2019

सेलूत भव्यरँलिव्दारे पालिकेच्या कर्मचा-यांनी दिला स्वच्छतेचा संदेश.

 राहुल लोणीकर, नगराध्यक्ष बोराडे यांचा सहभाग. 


सेलू,प्रतिनिधी

शहराच्या स्वच्छतेला नगर पालिकेने विशेष महत्व दिले असून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत  शहरात विविध माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. नगर पालिकेच्या सफाई कामगार तसेच ईतर सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी रविवार दि. १३ जानेवारी रोजी शहरातून भव्य रॅलीव्दारे  सेलूकरांना  ख-या अर्थाने स्वच्छतेचा संदेश दिला तर शहरातील नागरिकांनी देखील फटाक्यांची आतीषबाजी आणि सफाई कामगारासह रँलीमधील मान्यवरांवर ठिक ठिकाणी फुलांची उधळण करुन स्वागत केले. शहरातील लोकमान्य टिळक यांच्या  पुतळ्याला जालना जि.प.चे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे युवानेते राहुल लोणीकर, नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरूवात करण्यात आली. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी देवीदास जाधव, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेश बोराडे, उपजिल्हा रूग्णालयाचे  अधिक्षक डाॅ. संजय हरबडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, पंजाब बोराडे, स्वच्छतादुत जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, वल्लभ लोया, माजी नगराध्यक्ष मारोती चव्हाण, नगरसेवक शेख रहिम, विठ्ठल काळबांडे, गौतम धापसे, मनिष कदम, नगरसेविका शोभा कोरडे, लेखापाल अशोक कासार, संजय राजुरकर, सर्व पत्रकार, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार व बचतगटाच्या महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रॅलीत सहभागी पूरूषांना टीशर्ट व गूलाबी रंगाचे फेटे तर महिलांना गुलाबी रंगाची साडी, सनकोट व गुलाबी फेटा असा पेहराव रँलीचा विशेष आकर्षक ठरला. यामुळेे रँलीचा रस्ता गुलाबीमय दिसत होता. हातात स्वच्छतेचे फलक घेऊन ही रॅली टिळकांच्या पुतळ्यापासून सुभेदार गल्ली, शेरे गल्ली, राम मंदिर रोड, फुलारी गल्ली, मारवाड गल्ली, आठवडी बाजार, जवाहर रोड, स्टेशन रोड मार्गे पालिका .
परिसरात आली. येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली नगर पालिका कार्यालयाच्या परिसरात विसर्जित करण्यात आली. याठिकाणी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्र मंडळाच्या वतीने रॅलीतील सहभागी कर्मचारी, अधिकारी यांना ठेवण्यात आलेल्या स्नेहभोजना नंतर सांगता झाली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें