क्युरिअस कीड्स प्री-स्कुल ग्रँड लाँन्चींगचे उद्घाटन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 22 जनवरी 2019

क्युरिअस कीड्स प्री-स्कुल ग्रँड लाँन्चींगचे उद्घाटन.

सेलू प्रतिनिधी.
सेलू:- येथील सँनरो एजुकेअर प्रा. लि. प्रस्तुत क्युरिअस कीड्स प्री स्कुल ग्रँड लाँन्चींगचा कार्यक्रम   (ता.२०) वार रविवार रोजी सिटी पँलेस परभणी येथे पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आयसा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र दायमा यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सँनरो एजुकेअर प्रा. लिचे चेअरमन डॉ. संजय रोडगे, अकँडमीक डायरेक्टर अन्नपूर्णा चिंतातुरी, आयसा संघटनेचे प्रदेशसचिव भरत भांदरगे पाटील, आयसा मराठवाडा प्रमुख गव्हाणे, आयसा संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष दत्तराव पौळ आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
नाविन्यपूर्ण व कृतीयुक्त शिक्षण प्रणाली तसेच फिनलँड एज्युकेशन अध्यापन पद्धतीवापर असलेल्या  क्युरिअस कीड्स प्री स्कुलची संकल्पना आपल्या भारतात नवीन स्वरुपाची असल्या कारणाने तिचा प्रसार सुरु असल्याने या संकल्पनेचे जाळे संपूर्ण भारतभर पसरवत आहोत. याचीच फलनिश्चिती म्हणजे भरपूर ठिकाणाहून मिळणारा प्रतिसाद असल्याचे डॉ. संजय रोडगे यांनी सांगितले.
या प्रंसगी परभणी जिल्यातील विविध संस्थेचे संस्थाध्यक्ष, डाँ.अपुर्वा रोडगे, डाँ.अदित्य रोडगे, प्रा. महादेव साबळे, राजेश घनसावंत,क्युरिअस कीड्स प्री स्कुलच्या मेरीना अवागशिनी, किमी चोंगलाई.या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेरीना अवागशिनी यांनी तर आभार तेजस्विनी देशपांडे यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें