सेलू प्रतिनिधी.
आज साई कृपा माध्यमिक विद्यालय बोरी येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रिन्स अकॅडमी सीबीएसई सेलूच्या विद्यार्थ्यांनी अपंग व्यक्ती साठी स्वस्त , प्रदूषणमुक्त , गरीब लोकांना परवडणारी,टाकाऊ वस्तू पासून तयार केलेली #AWAAZ004 नावाची बहुउपयोगी सायकल सादर करून माध्यमिक गटात प्रथम पारितोषिक पटकावले .
आर्यन सासवडे,वेदांत पामे, विष्णू तोंडे ,सय्यद झैफ या विद्यार्थ्यांनी सेल्फ balencing physics principal नुसते पुस्तकात न वापरून प्रत्यक्षात अंमलात आणून त्याचा आपल्या समाजासाठी कसा उपयोग होईल हा विचार घेऊन हे #आवाज004 नावाची अपंग व्यक्ती साठी सायकल तयार केली .
डॉ संजय रोडगे सरांचा मूळ उद्देश हाच आहे की विद्यार्थी हा पुस्तक वेडा नसावा त्याला आपण ज्या समाजात राहतो त्यांची जाण सुद्धा पाहिजे कारण त्या समाजातील अडचणींवर मात करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा ठरतो . या प्रकारचे विद्यार्थी घडवण्याचे काम प्रिन्स अकॅडमी सीबीएसई सेलू येथे डॉ संजय रोडगे सरांच्या मार्गदर्शन खाली होत आहे. 21 व्या शतकातील जगासमोरील आव्हान काय असेल त्या आव्हानांना आपल्या शाळेतील विद्यार्थी कुठेही मागे राहू नये यासाठी सरांची धडपड नेहमीच नवीन प्रयोगात्मक शिक्षणावर असते .
हाच दृष्टिकोन बाळगून आपल्या विदर्थ्यांनी सलग तीन महिने मेहनत घेऊन ही बहुउपयोगी सायकल तयार केली
या यशासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे सचिव डॉ सविता रोडगे , डॉ आदित्य रोडगे प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे , प्राचार्य व विज्ञान प्रतिकृती साठी विज्ञान मार्गदर्शक शिक्षक नारायण चौरे, भगवान क्षीरसागर, अक्रम शेख ,प्रेम छेत्री यांनी विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक केले व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें