पाथरी प्रतिनिधी/नदीम तांबोळी
शेतकरी ,शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नावर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने दिं08/01/2019 रोजी सेलू कॉर्नर पाथरी येथे एक तासभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. परभणी जिल्हात भीषण दुष्काळ पडलेला असताना देखील शेतकऱ्यांना हक्काचे धरणातील पाणी दिले जात नाही. म्हणून जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात पाणी सोडा,निम्न दुधनाचे पाणी नदी पाञात सोडावे ,शेतकर्यांना हक्काचा पिक विमा दयावा,एफआरपी प्नमाणे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना रक्कम द्या ,रेशन द्या, जनावरांना दावणीवर चारा द्या इत्यादी महत्वाचे मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने एक तासभर पाथरी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तेथे काँ.दिपकराव लिपणे ,काँ.सुभाष नखाते,काँ.लिंबाजी कचरे पाटील काँ.भागवत कोल्हे काँ.प्रदीप नखाते सर्व शेतकरी व किसान सभेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें