समूहगीतगायनात नूतन विद्यालयाचा संघ प्रथम. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 12 जनवरी 2019

समूहगीतगायनात नूतन विद्यालयाचा संघ प्रथम.

सेलू प्रतिनिधी.
सेलू, ता. १२ : येथील भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वामी विवेकानंद शाळेतर्फे शुक्रवारी दि.११ जानेवारी रोजी आयोजित समूह गीतगायन स्पर्धेत नूतन विद्यालयाच्या संघांने प्रथम क्रमांक मिळविला. " दख्खनच्या हे प्रतापसूर्या जय जय शिवराया..." हे  स्फूर्तीगीत सादर करून रसिकांची मने जिंकली. संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे यांच्या मार्गदर्शनात कीर्ती  घांडगे, वेदिका  जोशी, सुप्रिया कुलकर्णी, वीणा बिनायके, गौरी सोनी
अमेय गांजापूरकर, अभिजित गायकवाड, वरद राऊत , सावरगावकर, वैभव खरावणे  यांचा संघात समावेश होता, तर सामान्य ज्ञान-  शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत इयत्ता आठवी : प्रथम : आदित्य खरात, व्दितीय : सुमीत ताल्डे , ओमकार दिवटे, इयत्ता पाचवी : तृतीय : रोनीत पाटोदकर या विद्यार्थ्यांना बन्सीधर पद्मावत, सुनील तोडकर, श्री कडगे यांनी मार्गदर्शन केले. संस्थाध्यक्ष डॉ एस.एम.लोया, उपाध्यक्ष अॅड.वसंतराव खारकर , सचिव डी.के.देशपांडे  , सहसचिव डॉ विनायकराव कोठेकर , जयप्रकाश बिहाणी,  मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी ,  उपमुख्याध्यापक अशोक गाजरे, पर्यवेक्षक मा. मा.सूर्वे, रामकिशन मखमले , संतोष पाटील  रघुनाथ सोन्नेकर, अशोक लिंबेकर , बाबासाहेब हेलसकर, काशिनाथ पल्लेवाड, अतुल पाटील आदींनी  कौतुक केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें