शिर्डी, प्रतिनिधी,(राजेंद्र दुनबळे)
केलेल्या मतदानाची योग्य खात्री होत नसतांना देश भरात अनेक ठिकाणी मत पेट्यावरून अविश्वास मतदारांचा झाला होता या कारणाहून आता E,V,M मशीन द्वारे VVPAT वर आपण केलेल्या मताची पडताळणी पहाता येणार आहे सावळीविहिर येथे या उपकरणाची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली ,या प्रसंगी तहसीलदार माणिकराव आहेर ,राहता पंचायतीच्या सभापती सो,हिराबाई भाऊसाहेब कतोरे,पंचायत समिती राहता सदस्य ओमेश जपे , कृषी बाजार समितीचे संचालक बाळासहेब जपे,सवळीविहिरच्या सरपंच सो, रुपाली आगलावे,उपस्थित हेते विजयराव हिरे यांनी अतिशय सोप्या भाषेत नागरिकांना यासंदर्भात माहिती दिली ,आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये याचा उपयोग होणार असल्याने अनेक नागरिकांनी बटन दाबून आपलेमत योग्य झाले का नाही याची प्रत्यक्ष पहाणी केली आता मतदान करतांना आपले मत योग्य उमेदवारालाच जाणार असल्यामुळे मतदारांची काळजी यावेळी दूर झाली ,या वेळीनायब तहसीलदार म्हस्के, ग्रामसेवक खर्डे,तलाठी सतीश गायके, मंडळ अधिकारी जाधव सो, रमेश आगलावे, नवनथ जपे ,विनायक आगलावे,रवींद्र गायकवाड रावसाहेब येख डे , शांताराम जपे,संतोष गायकवाड मनोज जपे , शिक्षक दत्ता गायकवाड, येवलेसर,हिरे सर,बाबा खरात,पंकज दर्शनेसर, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें