कोपरगाव आणि पाणी टंचाई हा समीकरण तस नवा नाही! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 31 दिसंबर 2018

कोपरगाव आणि पाणी टंचाई हा समीकरण तस नवा नाही!


शिर्डी प्रतिनिधी
कू.किरण जाधव.

अनेक दिवसांपासून कोपरगाव शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे आणि त्यातच 29 डिसेंबर पासून शहरातील पाणीपुरवठा सहा दिवसाआड करण्याचे फर्मान नगरपालिकेने काढले आहे, त्यामुळे आईन हिवाळ्यातच कोपरगाव करांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे.
          अगोदरच कोपरगाव शहर पाणीटंचाईला तोंड देत असताना शहरात मात्र अनेक ठिकाणी जलवाहिनिवर मोठमोठे लिकेज होऊन त्यात हजारो लिटर पाणी वाया जात आहे,शहरातील चमडा बाजार  रोड परिसर तसेच खडकी रोडला भारत गॅस गोडाऊन समोर, समता नगर भागात काही ठिकाणी आणि शहरातील विविध भागात छोटे-मोठे लिकेज आहे आणि या  लिकेज मधून हजारो लिटर पाणी रस्त्यावरून शेकडो मीटरपर्यंत वाहत आहे,तर  काही ठिकाणी रस्त्यावर पाण्याचे तळे साचलेले दिसुन येत आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरुन चालने देखिल  कठीण होत आहे.
           या विषयावर नगरपालिकेत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा याकडे पालिका प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही यावेळी माय न्युजच्या प्रतिनिधींनी नगरपालिकेत चौकशी केली असता लिकेजचा  ठेकेदार माणसं द्यायला तयार नाही असे उत्तर मिळाले. जर  पालिका प्रशासनाने या लिकेज कडे  लक्ष देऊन त्यावर उपाय केला नाही तर पुढील काळात कोपरगावकरांना  मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही?

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें