_तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने विधानसभेच्या 88 जागांवर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर, तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी शपथ घेतली. तर, अली यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. मात्र, राव यांच्या आमदारांसह एकूण विजयी आमदारांमध्ये 43 आमदार पदवीधर, 26 आमदार पदव्युत्तर तर 27 आमदार डिप्लोमा होल्डर किंवा बारावी पास आहेत._
◾तेलंगणा विधानसभेतील नवनियुक्त 119 आमदारांपैकी 58 टक्के आमदार पदवीधर आहेत.
◾तेलंगणातील 119 आमदारांपैकी 43 आमदार पदवीधर, 26 पदव्युत्तर, 2 पीएचडी होल्डर तर 27 जण डिप्लोमाधारक किंवा बारावी पास आहेत.
◾त्यापैकी 11 जणांकडे एलएलबीची पदवी आहे.
◾9 जण इंजिनिअर पदवीधारक आहेत.
◾5 जण डॉक्टर आहेत.
विशेष म्हणजे या यादीतील बहुतांश आमदार हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिक्षण घेतलेले आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें