सोनपेठच्या सोनखेड येथे स्व.गोपीनाथ मुंडे जयंती साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 16 दिसंबर 2018

सोनपेठच्या सोनखेड येथे स्व.गोपीनाथ मुंडे जयंती साजरी.



सोनपेठ (प्रतिनिधी) लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती, शुक्रवार दि.१४ रोजी शहरातील  सोनखेड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

केंद्रीय ग्रामविकास मंत्री स्व.गोपिनाथरावजी मुंडे यांच्या जयंती निमित्त सोनखेड येथून सोनपेठ शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपस्थित पाहुण्यांचे हस्ते शालेय विद्यार्थांना वह्या पुस्तके पेन आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच स्व. मुंडे यांच्या जिवन कार्यावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषनातून प्रकाश टाकला. याप्रसंगी रंगनाथ सोळंके,प्रा.विठ्ठल म जायभाये, भगवानराव मोहिते, अजित देशमुख,उत्तम आण्णा, आनंद गुजराथी, श्रीराम मुंडे, तसेच सोनखेड येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन स्व.गोपिनाथरावजी मुंडे मित्र मंडळ सोनखेड यांच्या वतीने करण्यात आले होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें