शिर्डी प्रतिनिधी
कु.किरण जाधव.
सूर्यतेज संस्थेच्या वतीने विशेष जादू प्रयोगाचे आयोजन
धकाधकिच्या जीवनात मनुष्याला तणावमुक्ती आवश्यक असून जादूच्या
प्रयोगा सारखी मनोरंजनाची साधने माणवाला तणावमुक्तीसाठी पुरक ठरतात.
जादू हि कला प्रत्यक्ष पहाण्याचा आनंद वेगळाच असल्याने प्रत्येकाने
पहावी.असे आवाहन लिम्का बुक आँफ रेकॉर्ड व राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित
जादुगार आंचल कुमावत यांनी केले.
सूर्यतेज संस्थेच्या वतीने पंडित मदनमोहन मालवीय,भारतरत्न अटलबिहारी
वाजपेयी यांची जयंती आणि नाताळ निमित्त पत्रकार यांचे कुटुंबियांसाठी
तणावमुक्ती मनोरंजन करिता जादुगार आंचलच्या विशेष प्रयोगाचे आयोजन
करण्यात आले होते. याप्रसंगी जादुगार आंचलचा सूर्यतेज संस्थेच्या वतीने
सत्कार करण्यात आला.तसेच पत्रकार यांचेही स्वागत करण्यात आले.
विश्वविख्यात जादुगार आंचल गिरिधरलाल कुमावत यांनी जादुचे विविध प्रयोग
सादर करतांना बारा फुटी स्टाचू आँफ लिबर्टी क्षणार्धात गायब करणे,हातात
राष्ट्रध्वज घेवून हवेत तरंगणारी भारतमातेच्या वेशभुषेतील मुलगी ,पैशांचा
पाऊस पाडणे,स्वता:च्या शरिराचे दोन तुकडे करणे,माणसाची उंची क्षणार्धात
कमी करणे.यासह सामाजिक संदेश स्त्री भ्रुण हत्या असे विविध प्रयोग
लहान-मोठ्यांसह सर्व स्तरातील लोकांसाठी मनोरंजन करतात.
या प्रयोगात तारा कुमावत,चंदा,मँजिशन गुरु,हिना,सागर,अमर,सुनिल, राहुल
यांचे सहकार्य मिळाले.
या प्रयोगाच्या आयोजनात सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत
घोडके,सरकारी वकील अँड.अशोक टुपके,सूर्यतेजचे प्रा.रश्मी जोशी,शिरिष
धनवटे,सौ.योगिता माळवे,पल्लवी रुईकर,सौ.भोकरे,अँड.श्रध्दा जवाद,अनंत
गोडसे यांचे सह सूर्यतेज संस्थेचे सदस्य, पत्रकार यांचे कुटुंबिय मोठ्या
संखेने उपस्थित होते.सर्वांनी जादुगार आंचल व उपक्रमाचे कौतुक केले.
सूर्यतेज संस्थेच्या वतीने लिम्का बुक आँफ रेकॉर्ड व राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित जादुगार आंचलचा सन्मान करतांना सूर्यतेज संस्थेचे सदस्य...

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें