वरुड (पिंप्री)येथे थेट कामावर आ.अब्दुल सत्तार यांनी भेट देऊन मजुरांच्या समस्या जाणून घेतल्या;
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 26/12/2018.
सिल्लोड तालुक्यातील वरुड (पिंप्री)येथे महिनाभरापासुन रोजगार हमी योजनेंतर्गत पाझर तलावातून गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. सदरील कामांवर 500 हून अधिक मजुर काम करीत आहे. महिनाभरापासुन मजुरांकडून पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम करण्यात येत असतांना अद्यापही मजुरांना कामाचा मोबदला देण्यात आला नसल्याची माहिती आ.अब्दुल सत्तार यांना मिळताच आ.अब्दुल सत्तार यांनी थेट कामावर जाऊन मजुरांच्या अडी अडचणी समस्या जाणून घेत संबंधित अधिका-यांना तात्काळ कामाचा मोबदला देण्याविषयीच्या सुचना दिल्या.
सतत तीन वर्षापासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी - शेतमजुर - गोरगरिबांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कामे उपलब्ध नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत शिवरस्ते - पाणंद रस्ते - मजबूतीकरणासह शेततळी - विहिर खोदकाम - पाझर तलावांमधील गाळ काढण्यासह आदी कामे रोजगार हमी योजनेंतर्गत करुन मजुरांना कामे उपलब्ध करण्यात यावी असी मागणी माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिका-यांडे निवेदनाद्वारे केली आहे.
अशाच भयावह परिस्थितीत सिल्लोड तालुक्यातील वरुड (पिंप्री)येथे रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीने पाझर तलावातून गाळ काढण्याचे काम हाती घेतले. सदरील कामांवर 500 हून अधिक मजुर काम करीत आहे. महिनाभरापासुन मजुरांकडून गाळ काढण्याचे काम करण्यात येत असतांना अद्यापही मजुरांना सदरील कामांचा मोबदला देण्यात आला नसल्याने मजुरांवर मोबदल्याविना उपासमारीची वेळ आली आहे. सदरील मजुरांची गंभीर परिस्थितीची माहिती आ.अब्दुल सत्तार यांना मिळताच आ. अब्दुल सत्तार यांनी थेट सदरील कामांवर भेट देऊन मजुरांच्या अडी अडचणी समस्या जाणून घेत उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड - तहसीलदार रामचंद्र गोरे - गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे तसेच संबंधित अधिका-यांना तात्काळ मजुरांच्या कामांचा मोबदला देण्याविषयीच्या सुचना देण्यात आल्या.
संबंधित अधिका-यांच्या दिरंगाईमुळे 500 हून अधिक मजुरांवर कामांचा मोबदला अद्यापही देण्यात आला नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.मजुरांसाठी थेट कामांवर विविध उपाययोजना करण्याची गरज आहे. सामाजिक वनीकरण विभागांतर्गतही कामे उपलब्ध करुन देण्यात यावे,मतदारसंघातील रोजगार हमी योजनेंतर्गत
एजन्सीने नवीन कामे तात्काळ उपलब्ध करुन मजुरांची कामासाठी होत असलेली भटकंती थांबवावी,पाझर तलावा सभोवतालच्या शेतक-यांनी ट्रॅक्टरने गाळ घेऊन जाण्यासाठीहीच्या सुचनाही माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी दिल्या .
चौकट - भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असुन शेतकरी - शेतमजुर - गोरगरिबांना कामासाठी भटकंती करावी लागत आहे. रोजगार हमी योजनांतर्गत कामे उपलब्ध करुन नियमाप्रमाणे पंधरा दिवसाचे आत मजुरांना कामाचा मोबदला देण्याबरोबरच कामाच्या मोबदल्यात गव्हू - तांदूळही देण्यात यावे असी मागणी माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी यावेळी केली. यावेळी सरपंच गुलाबराव मिरगे,रतन मिरगे,राम सरोदे, सुरेश थोरात,अशोक मिरगे,भानुदास मिरगे,दादाराव गाडेकर,रामदास मिरगे,साहेबराव मिरगे,ग्रामसेवक डि.पी.कंकाळ,इंजिनिअर देवगिरीकर,विनोद थोरात आदिंसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें