बाबरी मशीद पाडणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मानवत येथील मुस्लीम समुदायाची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 6 दिसंबर 2018

बाबरी मशीद पाडणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मानवत येथील मुस्लीम समुदायाची मागणी.


मानवत/ मुस्तखीम बेलदार.
दि.०६: अयोध्या येथील बाबरी मशीद उध्वस्त करणार्‍या आरोपीवर कठोर कारवाई करून बाबरी मशीद  त्याच ठिकाणी पूर्न  निर्माण करावे या मागण्याचे निवेदन आज दिनांक ६ डिसेंबर रोजी मानवत तहसिलदार डि.डि.फुफाटे मार्फत माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेद्र मोदि यांना मानवत येथील मुस्लीम बांधवाच्या वतीने देण्यात आले.
निवेदनात नमुद केले आहे की ६  डिसेंबर १९९२  रोजी आयोध्या येथे  काही देशद्रोही लोकांनी  नियमाचे उल्लंघन करून बाबरी मशीद पाडली यामुळे देशातील हजारो मुस्लिम समाजाचे  मन दुखावले आहे  बाबरी मशिद पाळणाऱ्यावर आजपर्यंत काही कारवाई झाली नाही यामुळे या आरोपीवर कडक कारवाई करून बाबरी मशिद  त्याच जागेवर बाधण्यात  यावी  अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी  मुक्ती इसाक साहेब,हाफिज लतीफ साहेब ,हबीब भडके ,नगरसेवक सय्यद जमील, शेख समीर,मोहम्मद मुस्ताक, एजाज खान, अपसर अन्सारी , महबुब मंन्सुरी,हाफेज  अकबर ,आनंद मामा भदर्गे ,ऋषिकेश बारहाते,सय्यद समीर यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें