संत गाडगे महाराज यांनी स्वच्छता ही एक चळवळच उभी केल्याचे काम केले - आ. अब्दुल सत्तार; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 21 दिसंबर 2018

संत गाडगे महाराज यांनी स्वच्छता ही एक चळवळच उभी केल्याचे काम केले - आ. अब्दुल सत्तार;

संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन;

सिल्लोड (प्रतिनिधी)दि 21
गावा - गावात जाऊन खराटा हाती घेत आयुष्यभर एकप्रकारे स्वच्छता मोहीम राबवित स्वच्छता ही एक चळवळच उभी केल्याचे काम संत गाडगेबाबांनी केले असल्याचे मत माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
सिल्लोड शहरातील संत गाडगे बाबा पुतळ्यास पुण्यतिथीनिमित्त माजीमंञी आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल अग्रवाल,माजी उपनगराध्यक्ष संजय आरके,मनोहर आरके,जितेंद्र आरके,साहेबराव सिरसाठ, सखाराम अहिरे,जगन्नाथ कुदळ,रवि आरके,फईम पठाण आदिंसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें