सेलू प्रतिनिधी
सेलू:- येथील श्रीराम प्रतिष्ठान येथे
सुरभि महोत्सव आयोजित अांतरशालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजण (ता.१) वार शनिवार रोजी प्रिन्स अकँडमी विद्याविहार संकुल येथे पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
संस्थेच्या सचिव डाँ.सौ. सविताताई रोडगे उद्घाटक म्हणुन संस्थेचे मार्गदर्शक तथा प्रेरणास्थान आदरणीय डॉ. रामरावजी रोडगे भाऊ, शाळेच्या मुख्याध्यापिका शालिनी शेळके, उत्कर्ष विद्यालायाचे मुख्याध्यापक दगडोबा माने एकात्मिक अदिवासी प्रकल्पाचे प्रमुख शिसोदे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेची सुरवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन तसेच क्रीडांगणावर नारळ फोडुन स्पर्धेची सुरवात करण्यात आली. यास्पर्धेत संस्थेतील प्रिन्स अकँडमी, प्रिन्स इंग्लिश स्कुल, प्रिन्स एकात्मिक अदिवासी प्रकल्प, उत्कर्ष विद्यालय, ज्ञानतीर्थ विद्यालय, ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय आदि शाळेतील इ.1 ली ते 10 वी पर्यतच्या विद्यार्थी विद्यार्थीनी सहभाग नोंदविला होता.
यावेळी खेळ म्हटला की सातत्य, खेळाची सवय प्रत्येकाच्या अंगी असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक खेळात भाग घेतला पाहिजे तसेच प्रत्येक खेळाचे महत्व, नियम याची ओळख जाणुन घेणे महत्वाचे असते. जेणेकरुन खेळतांना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. खेळामुळे आपले आरोग्य सुधारते.शारिरीक व बौद्धीक विकास हाऊन बुद्धीला चालना मिळते. एक संघ भावना निर्माण होते. तसेच दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन खुद्दुस जुलाहा यांनी केले व यशस्वितेसाठी प्रतिष्ठानच्या सर्व क्रीडा प्रमुख, शिक्षक कर्मचार्यांनी
आदीनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें