९३ बाल कलाकारांनी घेतला सहभाग.
सेलू प्रतिनिधी
सेलु :- येथील श्रीराम प्रतिष्ठान येथे वैयक्तिक नृत्य स्पर्धेचे आयोजन ता.१६ डिसेंम्बर वर रविवार रोजी क्युरीअस कीड्स विद्याविहार संकुल येथे पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे,प्रमुख पाहुणे म्हणून मा.स्नेहा सांगतानी, मा. प्रीती मेहता, सचिव डॉ.सविता रोडगे, परिक्षक हर्ष धवल, सुरेखा मुसळे, श्रुती ठाकूर क्युरीअस कीड्स प्रमुख किमी चोंगलाई, ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शालिनी शेळके आदी उपस्थित होते.
या वैयक्तिक नृत्य स्पर्धेत क्युरीअस कीड्स, न्यू मॉंडर्ण इंग्लिश स्कूल, नूतन इंग्लिश स्कूल, ज्ञानतीर्थ बालवाडी विभाग, प्रिन्स इंग्लिश स्कूल, व्हिजन इंग्लिश स्कूल मधील आदी एकूण ९३ शालेय बाल कलाकारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. हि स्पर्धा ३ वर्ष ते ७ वर्ष वयोगटासाठी ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेचा निकाल दि.29 डिसेंबर रोजी क्युरिअस कीड्स च्या गँदरींग दिनी वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम पारितोषिक 1001/-, द्वितीय पारितोषिक 501/- व तिसरे पारितोषिक 301/- असे रोख पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. तरी सर्व स्पर्धकांनी यांची नोंद घ्यावी.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कौशल पामे व पिंकी थापा तर आभार क्युरीअस कीड्स प्रमुख किमी चोंगलाई यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रतिष्ठानच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें