सोनपेठ दुष्काळ निवारण समितीचे विविध मागण्या करता धरणे आंदोलन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 28 दिसंबर 2018

सोनपेठ दुष्काळ निवारण समितीचे विविध मागण्या करता धरणे आंदोलन.




सोनपेठ मंजुर मूल्ला/येथील तहसील कार्यालयासमोर दि.२७ डिसेंबर रोजी दुष्काळ निवारण समितीच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

      सोनपेठ दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या वतिने तहसिल कार्यालयासमोर शेतकरी व शेतमजुराच्या विविध मागण्यासाठी एकदिवसीय धरने आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनक्रत्यांनी  जनावरांना दावणीवर चारा उपलब्ध करून द्यावा, माजलगाव धरणातुन सोनपेठ तालुक्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, खरिप व रब्बी पिकविमा तात्काळ देण्यात यावा,  रोजगार हमी योजनेची मागणी केलेल्या मजुरांना रोहयोची कामे उपलब्ध करून द्यावीत निराधाराच्या पगारी तत्काळ करावी,तालुक्यातील अवैध धंदे तत्काळ बंद करावे यासह विविध मागण्या करता एकदिवसीय आंदोलन करून वरिल मागण्याचे निवेदन तहसीलदार जिवराज डापकर यांना देण्यात आले. निवेदनावर काॕ राजन श्रीरसागर, माणीक कदम, शिवाजी कदम, मुरली पायघन, सुशील सोनवणे, जावेद अन्सारी, सिताराम खेडकर, पंडीतराव भोसले, रामेश्वर पंडीत आदीची नावे आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें