नागठाणा पाटीवर रोडवर वाटमारी.तिघांवर गुन्हा दाखल. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 28 दिसंबर 2018

नागठाणा पाटीवर रोडवर वाटमारी.तिघांवर गुन्हा दाखल.



 सेलू प्रतिनिधी

  सेलू तालुक्यातील सेलू ते देवगावफाटा -  रस्त्यावर नागठाणा पाटी दरम्यान अज्ञात ६ते ७  जणांनी एका मोटरसायकल स्वारास अडवून  त्याच्यावरती चाकू हल्ला केला या दरम्यान ग्रामस्थांनी या अज्ञात चोरटे पेकी एका झणांला  पकडून चारठाणा पोलिसांच्या ताब्यात दिले असुन पकडलेल्या चोरट्यांचे नांव सुनिल पवार असे आहे.
                   याबाबतची माहिती अशी की नागठाणा येथील गोविंद श्रीमंत मोगल  हे मोटरसायकलने देवगाव फाटा येथुन  नागठाणा कडे जात असताना नागठाणा पाटी दरम्यान सहा  ते सात जणांनी गोविंद मोगल यांना अडवून त्यांच्यावर चाकू हल्ला केला व त्यांच्याकडील पैसे व मोबाईल घेतला या घटनेची माहिती कळताच नागठाणा येथुन चंदू मोगल भाऊसाहेब मोगल यांच्यासह गावातील ग्रामस्थ घटनास्थळी धावले यादरम्यान एकाला चोराला  पकडण्यात चंदू मोगल यांना  यश आले त्या पकडलेल्या ईसमाचे नाव सुनिल पवार रा.खुराणपुर  जि. बुलढाणा असून ग्रामस्थांनी या चोरास बेदम मारहाण केली व नंतर त्या चोरास चारठाणा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे यादरम्यान घटनास्थळी जिंतूर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरवाडीकर , पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेल्या गोविंद श्रीमंत मोगल यांच्या वरती सेलू येथे खाजगी रुग्णालयात उपचार चालू केले आहेत.


 बोरकिनी येथील एकाचे केले अपहरण

          सेलू तालुक्यातील बोरकिनी येथील एक जणाचे अपहरण केल्याची घटना २७ डिसेंबर रोजी सायं६:३० वा सुमारास घडली
              याबाबतची माहिती अशी की बोरकिनी येथील बबन हावळे हे ट्रॅक्टरने घरी येत असताना  दुचाकीवरील अज्ञात तिघांनी त्यांचे ट्रॅक्टर थांबवून त्यांच्या ड्रायव्हर नरायण ढाले यालाखाली ओढले या ड्रायव्हरने उसाच्या टोळीचे पैसे उचलून आणल्या बाबत त्यांच्यात बाचाबाची झाली नंतर मारहाण करीत आसतांना  . दुचाकीवरील तिघांना  बबन हावळे यांनी विरोध केल्यामुळे त्या दुचाकी वरूण आलेल्यांनी  बबन हावळे यांचेच  अपहरण केले याबाबत फिर्याद नोंदविण्याचे काम चारठाणा पोलीस स्टेशन तिघांवर गुन्हा दाखल हरी सुभाष पवार राहणार  चारठाणा तालुका जिंतूर जिल्हा परभणी रवी रामचंद्र पवार राहणार खुरानपुर ता लोणार सुनील यानगंध पवार राहणार खुरानपुर ता  लोणार जिल्हा बुलढाणा या तिघांवर गुन्हा दाखल  झाला आहे पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी  अनिल घेरवाडीकर यांच्या मार्गदर्शनात तपास चालु आहे .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें