उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले निवेदन.
भोकरदन प्रतिनिधी:अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावरील मुस्लिम ट्रस्ट पीर दावल मलिक देवस्थान जमिनीवरील सर्व अनधिकृत बांधकामे तत्काळ काढा अन्यथा आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर कर्जत येथील तौसीफ हमीम शेख या इसमाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून घेतले. इशारा दिला असतानाही प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही आणि सदरची दुर्घटना घडली. संबंधित अधिकार्यांनी सदरचे बांधकाम पाडून टाकण्याबाबत दि. ११ जुलै २०१८ रोजी आश्वासन दिले होते. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर दि. २० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोसिफ शेख यांनी उपोषण केले होते. त्यावेळीही पोलिस बंदोबस्तात बांधकाम काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर त्याने २०/१२/२०१८ तारखेला आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर येऊन त्याने अंगावर ज्वालाग्राही पदार्थ ओतला आणि क्षणात काडीपेटी लावली. पोलिस बंदोबस्त असताना त्याला वाचण्याचा का प्रयत्न झाला नाही.
म्हणून आपल्याला विनंती करण्यात येते की या संदर्भात तात्काळ कार्यवाहीचे आदेश देऊन दोषींवर सदोष मनुष्यहत्त्येचा गुन्हा दाखल करावा तसेच तोसिफ शेख यांच्या कुटुंबियांना ५० लाख शासकीय मदत तात्काळ जाहीर करून देण्यात यावे व त्याच्या पत्नीस अथवा कुटुंबीयांपैकी एकास शासकीय सेवेत सामावून घ्यावे इत्यादि मागनीचे निवेदन महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान भोकरदनच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात येईल.असा इशारा निवेदांकर्त्यांनी दिला. यावेळी महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानचे जिल्हाउपाध्यक्ष इसरार खान,भोकरदन तालुका अध्यक्ष शेख सलिम, शेख मुक्तर,माजी.नगरसेवक शब्बीर कुरेशी, शेरखान ,नुझेर शाह,औरंगाबाद जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष शेख कलिम, सोशल मीडिया ता.अध्यक्ष शेख जुनेद,भारिप ता.अध्यक्ष, प्रदीप जोगदंडे, जावेद पठाण,शेख निसार,मुजाहेद पठाण,अमजत पठाण,जुल्फिकार बेग,भीमशक्तीचे जयेंद्र बोर्डे,सांडू पगारे, सय्यद नासेर बिल्डर, आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें