सोनपेठ शिवसेनेची क्रीडा संकुलांची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 30 दिसंबर 2018

सोनपेठ शिवसेनेची क्रीडा संकुलांची मागणी.

                       
सोनपेठ मंजूर मूल्ला/सोनपेठ शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र शासनाच्या धोरणाप्रमाणे तालुक्यात क्रीडा संकुल करण्याची मागणी सोनपेठ तहसिलदार मार्फत मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन द्वारे करण्यात आली.                         .                                                                                              . शहर शिवसेनेच्या वतीने जमीन हस्तांतरणामुळे होणाऱ्या विलंबाच्या प्रक्रियेने क्रीडा संकुल होत नाही, तरी ही अडचण दुर करावी आणि महाराष्ट्र शासनाच्या धोरणाप्रमाणेच क्रीडा संकुल करण्यात यावे तालुक्यात चांगले खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी शासनाने क्रीडा संकुल उभारण्यावर भर दिलेला आहे पण सोनपेठ येथील जायकवाडी परिसरातील पडीक जमीन या क्रिडासंकुलास हस्तांतरीत करण्यासाठी होत असलेल्या विलंबामुळे क्रीडा संकुल होत नाही, ही बाब गंभीर आहे तरी येत्या आठ दिवसात जमीन हस्तांतरणाची कार्यवाही करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा सोनपेठ शहर शिवसेनेने निवेदनात केला आहे.
या निवेदनावर शहरप्रमुख विश्वजित कदम, शेख जावेद,गोविंद चोरमले, अमोल बोडके, कपील महाजन, कृष्णा शिंदे, गणेश लिंबुटकर, गणेश साळुंके, उमेश महाजन ,गोटू पोटे आदी शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें