सेलू प्रतिनिधी.
सेलू, येथील न्यू हायस्कूल शाळेचे शिक्षक धनंजय भागवत यांची परभणी जिल्ह्यासाठी एम इ आर म्हणून निवड झाली आहे. राष्ट्रिय माध्यमिक शिक्षा अभियान (आर एम एस ए) च्या चेस (CHESS) कार्यक्रम अंतर्गत इंग्लिश टिचर्स फोरम (ETF) कार्यक्रमासाठी महाराष्ट्र स्तरावर प्रत्येक जिल्ह्यासाठी एका इंग्लिश शिक्षकाची निवड करण्यात आली. परभणी जिल्ह्यासाठी निरिक्षण, मूल्यमापण व अहवाल सादर करण्यासाठी एम इ आर म्हणून भागवत यांची निवड झाली आहे.
प्रादेशिक विद्या प्राधिकरण (आंग्लभाषा तत्वज्ञ), औरंगाबाद चे संचालक डाँ. सुभाष कांबळे यांनी तशा आशयाचे पत्रक काढले आहे. यासाठी भागवत यांचे स्थानिक शालेय समितिचे अध्यक्ष अशोक काकडे व मुख्याध्यापक पगार बी एम यांनी अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें