शेतकऱ्यांचे पासबुक फाडून शिवीगाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची शेतकरी संघटनेची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 7 दिसंबर 2018

शेतकऱ्यांचे पासबुक फाडून शिवीगाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची शेतकरी संघटनेची मागणी.


प्रतिनिधी: मंज़ुर मुल्ला.
सोनपेठ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे लेखापाल रोहीत कुमार यांनी बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांचे पासबुक फाडून अश्लील शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक देऊन  बँकेच्या बाहेर हाकलून लावल्याबद्दल रोहित कुमार याचे निलंबन करून त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.
तालुक्यातील वाडी पिंपळगाव येथील शेतकरी माधव जाधव हे आपल्या खात्यावर दोन हजार रुपये भरण्यासाठी गेले असता बँकेचे कर्मचारी रोहित कुमार यांनी श्री जाधव यांना अश्लील शिवीगाळ करून पासबुक फाडून त्यांना बँकेच्या बाहेर हाकलले. याबाबत माधव जाधव यांनी सोनपेठ पोलीसात तक्रार दिली असून शेतकाऱ्यांना देण्यात आलेल्या हीन वागणुकीच्या विरोधात शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच मुजोर रोहित कुमार याचे निलंबन होई पर्यंत आंदोलन चालूच ठेवण्यात येणार असल्याचे मत शेतकरी संघटनेचे  सुधीर बिंदू, सोमनाथ नागुरे यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें