महिलांच्या मागण्यांसाठी मनसेचा आंदोलनाचा इशारा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 21 दिसंबर 2018

महिलांच्या मागण्यांसाठी मनसेचा आंदोलनाचा इशारा.


सेलू प्रतिनिधी. शमशेर खान.
सेलू शहरातील डीआरडी यादीत नावे समाविष्ट करण्यात यावे या मागणीसाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी यांना महिलांच्या मागणीसाठी  मनसे कडून निवेदन देण्यात आले.मागील तीन वर्षांपासून शहरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विधवा परित्यक्ता घटकातील महिलांच्या कुटुंबांना डी आर डी यादीत डावलण्यात आले असून या यादीत समाविष्ट करण्यात यावे या मागणीसाठी या महिलांच्या वतीने विविध आंदोलने करण्यात आली होती व त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासनही न प प्रशासनाकडून  देण्यात आले होते. सर्वसाधारण बैठकीत या संदर्भात ठरावाच्या प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन नगरपरिषदे कडून यापूर्वी मिळाले होते परंतु अद्याप कुठलीही कारवाई झाल्याचे नसल्याने संतप्त महिलांनी मनसेचे गणेश भिसे ,तालुकाध्यक्ष निजलिंग  अप्पा तरवडगे यांना सोबत घेत त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी निवेदन देण्यात आले या निवेदनावर अश्विनी घोगरे चंद्रभागा पवार यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षरीसह उपस्थित होत्या, मागण्या पूर्ण न झाल्यास 27 डिसेंबर  रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असून या महिलांना मनसेचा पाठिंबा असल्याची माहिती मनसेचे गणेश भिसे व तालुका अध्यक्ष निजलिंग अप्पा तरवडगे यांनी दिली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें