जेष्ठ ग्रंथपाल ज्ञानोबा काशिनाथ भाबट यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार.
सेलू प्रतिनिधी शमशेर खान
परभणी येथील ग्रंथोत्सव या कार्यक्रमात सेलू तालुक्यातील खादगाव येथील श्री जगदंबा सार्वजनिक वाचनालय च्या ज्येष्ठ ग्रंथपाल ज्ञानोबा काशिनाथराव भाबट यांना जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे तसेच रामेश्वर पवार आदींच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सेलू तालुक्यातील ज्येष्ठ ग्रंथपाल यांची यावेळी उपस्थिती होती
या दोन दिवसीय ग्रंथोत्सवात उच्च व तंत्रशिक्षण ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या परिसरात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महापौर मिनाताई वरपुडकर ,सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे ,जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील ग्रंथालय संचालक डॉ.धनराज वीर, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर रामेश्वर पवार, सूनील पोटेकर, अनंत वाघ, अनिल बाविस्कर ,परमेश्वर सानप, कथाकार राजेंद्र गाहळ, बालासाहेब देवणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे आदींची यावेळी उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें