शिर्डी प्रतिनिधी
कू.किरण जाधव.
पर्यावरण जपण्यासाठी प्लास्टिक पिशवीचा वापर टाळण्यासाठी व कापडी पिशवीचा वापर व प्रसार वाढवा या करिता लायन्स मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सुरेख कापडी पिशवीची निर्मिती केलेली आहे. या प्रकल्पाचे उदघाटन शुक्रवारी 28 दिनांक रोजी लायन्स क्लबचे प्रांतपाल मा. रामेशभाई शहा ,पुणे. यांनी केले. तसेच श्री शहा यांनी या प्रकल्पाला प्रोत्साहन म्हणून 25000 रुपये देणगी जाहीर केली. सदर पिशवीचीे खरेदी करून मुकबधीर विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत व सहकार्य करावे. असे आवाहन संदीप रोहमारे यांनी या प्रसंगी केले. याप्रसंगी मुकबधीर विद्यालयाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी टीक्कल सरांनी शाळेची माहिती दिली . व आभार मानले.याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. अभिजित आचारी , लायनेस क्लबची अध्यक्षा डॉ. मंजुषा गायकवाड,लिओ क्लबचे अध्यक्ष योगेश पटेल, तुलसीदास खुबानी, स्वप्नील भांडरी, डॉ.विलास आचारी, बनसोडे सर, श्रेया रोहमारे, सत्येंन मुंदडा आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें