कै.मंगलाबाई पवार यांच्या स्मृति प्रित्यर्थ तालुकास्तरीय भव्य वकृत्व स्पर्धा संपन्न..... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 17 दिसंबर 2018

कै.मंगलाबाई पवार यांच्या स्मृति प्रित्यर्थ तालुकास्तरीय भव्य वकृत्व स्पर्धा संपन्न.....


      - सोनपेठ येथील व्हिजन पब्लिक स्कूल येथे 13 डिसेंबर रोजी कै.मंगलाबाई पवार यांच्या स्मृति प्रीत्यर्थ तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा आनंदमय वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये विविध शाळेतील एकूण 68 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेची सुरुवात कै.मंगलाबाई पवार यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून केली.या स्पर्धेला पर्वेक्षक बळीराम काटे(अध्यक्ष जय भवानी मित्र मंडळ, सोनपेठ) प्रशांत शिंगाडे(व्याख्याते,डीघोळ)हे होते.या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर अतिशय सुंदर प्रकारे आपले मनोगत मांडले.तसेच 14 डिसेम्बर रोजी बक्षीस वितारणाचा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुभाष पवार(तालुका वैद्यकीय अधिकारी,सोनपेठ)तर प्रमुख पाहुणे म्हणून भारत राठोड(मुख्य कार्यकारी अधिकारी,उदगीर) डॉ.दामोदर पवार,नामदेव पवार व श्री ह.भ.प.महादेवजी महाराज नरवाडे हे होते.या स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक पूजा नामदेव गावडे (जिजामाता विद्यालय सोनपेठ) द्वितीय क्रमांक संघप्रिया मिलिंद तुपसमिन्द्रे (जिल्हा परिषद विटा) व तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला रुद्राली नंदकिशोर घुगे (व्हिजन पब्लिक स्कूल,सोनपेठ)व श्रीनिवास गजेंद्र सूर्यवंशी(एल.आर.के इंग्लिश स्कूल सोनपेठ)   तसेच उत्तेजनार्थ बक्षीस प्रणाली पांडुरंग दुकळे (व्हिजन पब्लिक स्कूल,सोनपेठ) व आदिती भोसले(जिल्हा परिषद गवळी पिंपरी) या विद्यार्थ्यांनी बक्षीस पटकाविले आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भगवान घाटूळ सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रल्हाद निर्मळ सर यांनी केले.  कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्कूलचे प्राचार्य डॉ.दुकळे सर उपप्राचार्य श्रवण कुमार सर व शिक्षक वृंद यांनी प्रयत्न केले.

1 टिप्पणी: