मलकापूर:(सागर पाटील )मा. नरेंद्र मोदी विचारमंच,भारत यांच्या वतीने आज अंजली मंगल कार्यालय बेलवडे हवेली येथे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष मा.वासुदेव शर्मा,यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली मेळावा पार पडला.या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने झाली.या कार्यक्रमास मार्गदर्शन भाजपा जिल्हा अध्यक्ष मा.विक्रमजी पावसकर,भाजपा उपाध्यक्ष अनिलजी देसाई,रामकृष्ण वेताळ,प्रदेश अध्यक्ष मा. न.मो
वि. मंच संजय घार्गे,मा. न.मो.वि.मंच, भारत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा शालिनीताई गुणवंत,प्रदेश उपाध्यक्ष सयाजीराव पाटील,सातारा महिला विकास विभाग जिल्हा अध्यक्षा वैशाली गुरव यांची आदी भाषणे झाली.या मेळाव्यास महिला ग्रहउद्योग,महिला सबलीकरण,केंद्र व राज्य सरकारची योजना ,मुद्रा कर्ज,अण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज , बँकिंग प्रकल्प, व शासकीय कामे या विषयावर महिलांना मार्गदर्शन प्रमुख नेत्यांनी केले.यावेळी वासुदेव शर्मा म्हणाले की महिला उद्योजक झाल्याशिवाय खरा विकास साध्य होणार नाही व गरिबी मुक्त महाराष्ट्र होणार नाही महिलांना उद्योग देऊन स्वतःच्या पायावर उभे करणार असल्याचे शर्मा यांनी मेळाव्यास बोलतांना सांगितले.शालिनीताई गुणवंत आपल्या भाषणास म्हणाल्या की महिलांना एकत्रित करून व रोजगार देऊन महिलांना सोथाच्या पायावर उभे मा.नरेंद्र मोदी विचार मंच,भारत यांच्या वतीने करणार असल्याचे शालिनीताई गुणवंत यांनी सांगितले.यावेळी संगीता लोहार,भारती लोहार,प्रतिभा गुणवंत, दीपाली गुणवंत,रुपाली चव्हाण, किशोर गुणवंत, प्रमोद गुणवंत, विक्रम चव्हाण, सदाशिव मोहिते,विक्रम शिंदे,रुपाली माने,वैशाली लोहार,शारदा साळुंखे, संजय थोरात,व मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे प्रास्तावित सयाजीराव पाटील व सूत्र संचालन दीपक तडाखे सर यांनी केले.या कार्यक्रमास शालिनीताई गुणवंत यांचा मा.न.मो.वि. मंच यांच्या वतीनेविशेष सत्कार करण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें