सेलूत एकदिवसीय बालसंस्कार शिबिर संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 9 दिसंबर 2018

सेलूत एकदिवसीय बालसंस्कार शिबिर संपन्न.


सेलू प्रतिनिधी.
सेलू येथील मारुती नगरातील श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्रातर्फै रविवारी दि. ९ डिसेंबर रोजी आयोजित एकदिवसीय हिवाळी बालसंस्कार शिबीरात बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या व प.पु.गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने व श्री नितिनदादा यांच्या मार्गदर्शनाने एकदिवसीय हिवाळी बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सकाळी ८.०० वाजता भूपाळी आरती व दीपप्रज्वलनाने शिबीराला सुरूवात झाली.
नित्यसेवा- स्तोत्र, मंत्र पठणानंतर प्राणायम व योगासने घेण्यात आली. यावेळी
चित्रकला स्पर्धा,
माझी आई,
कालचा व आजचा विद्यार्थी या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. दुपारी १२.००वा मांदियाळी झाली. दुसऱ्या सत्रात  प्रश्नमंजुषा, मैदानी खेळ
(१६ विभाग) मार्गदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम झाला. बक्षिस वितरणानंतर राष्ट्रगीताने शिबीराचा समारोप झाला.  शिबीराच्या यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्राच्या सेवेकरी बांधवांचे व भगिनींनी पुढाकार घेतला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें