मानवत तालुक्यात चारा टंचाई शेतकरी चिंतातुर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 9 दिसंबर 2018

मानवत तालुक्यात चारा टंचाई शेतकरी चिंतातुर.


मानवत / मुस्तखीम बेलदार.
दि.९: मानवत तालुक्यात यंदा  कमी पाऊस झाल्याने परीसरात आतापासुनच चारा  टंचाई निर्माण झाली असुन पुढे जनावरांना साभाळायचे कसे यामुळे  शेतकरी चिंतातुर झाला आहे.
सध्या वाढ्यांची विक्री मोठ्याप्रमाणात होत असुन  ३५०  रुपयात  शंभर वाडे येत आहे पुर्वी १०० रुपयाला हि कोणी घेत नव्हते या भाववाढी मुळे  पशुपालका समोर चाराचा गंभीर प्रश्न उभा टाकला आहे विकत चारा घेऊन जनावरांना पालन पोषण करण्याची वेळ पशुपालकावर आलेली  आहे यंदाच्या संपूर्ण पावसामुळे हंगामात सरासरी कमी पाऊस झाला आहे परीणामी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे पिण्याच्या पाण्याचा  बरोबर  पशु चारा प्रश्न आता पासून निर्माण झाला आसुन  पशु  सांभाळने  आता शेतकरीना आवघड  झाले आहे .शेतकऱ्यांनी  शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला होता म्हैस गाय घेऊन व्यवसाय सुरू केला होता परंतु ओला चारा नसल्याने दररोज विकतचा चारा घ्यावा लागत आहे यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.शेतकऱ्यांना दर रोज चारा विकत घ्यावा  लागत आहे सध्या ऊस तोडणी सुरू आहे  त्यामुळे वाडे  विकायला  येत आहे  पुढे चाराचा प्रश्न गंभीर होणार आहे यामुळे प्रशासनाने आतापासुनच या बाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरीवर्ग करीत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें