मिर्झा काॅलनी - यशवंतनगर परिसरातील नागरिकांसी संवाद;
सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.३० ) -- सिल्लोड शहराची वाढती लोकसंख्येचा विचार करीत खडकपुर्णा मध्यम प्रकल्पातून सुरू असलेल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेमुळे शहराचा भूमीगत गटार योजनेला गती देणे शक्य होणार आहे. यातून शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह दुर्गंधीचा प्रश्नही मिटणार आहे. शहरात सर्वत्र पुल - सिमेंट रस्ता कामे प्रगती पथावर असुन अनेक ठिकाणचे नादुरुस्त वीजेची पोलची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे मत माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
सिल्लोड शहरात आमदार आपल्या दारी अभियान राबविण्यात येत असुन सिल्लोड शहरातील मिर्झा काॅलनी - यशवंतनगर काॅलनी येथील नागरिकांच्या दारोदार जाऊन विविध अडी अडचणी समस्या जाणून घेत घरकुल - रस्ते - पाणी - वीज या मुलभूत समस्यांचे निवारण करण्यात आले . प्रभाग क्रमांक ४ व यशवंतनगर काॅलनी येथील प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांच्या विविध अडी अडचणी समस्या जाणून घेण्यासाठी संपर्क कार्यालयाचे उदघाटन माजीमंञी आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, रऊफ बागवान, मनोज झंवर, आसिफ बागवान, हरिदास ताठे, कैसर आझाद, अमित आरके, सलिम हुसैन, सतिश ताठे, सत्तार हुसैन, दशरथ सुरडकर, अकिल वसईकर, लड्डू पटेल, राजरत्न निकम, मनोहर आरके, डाँ.फेरोज पठाण, अकिल देशमुख, संजय मुरकुटे, मतीन देशमुख, राजेश्वर आरके, इम्रान कुरैशी, भावराव दुधे, अब्दुल रहिम, रवि आरके, फईम पठाण, तौसिफ पठाण आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें