इयत्ता 6 वी मध्ये शिकणाऱ्या अरमान चे शौर्य.
मंगरुळ तालुका खानापूर येथील घटना मंगरूळ येथील इयत्ता 6 वी मध्ये शिकणाऱ्या आरमान कमृद्दिन मुल्ला या विद्यार्थ्यांच्या घरी शनिवारी 22 डिसेंबर रोजी एक दुर्दैवी प्रसंग घडला. अरमान ची आई सौभाग्यवती बरकत या कपडे धूत होत्या. कपडे धुताना कपडे वाळत घालायच्या दोरीवर कपडे धुवून वाळत घालू लागल्या . दोरी तारेची होती .त्या तारेला घरातील शॉर्टसर्किटमुळे एक वायर चिकटली आणि तारेतून वीज प्रवाह सुरू झाला. अरमानच्या आईने तारेवरती कपडे वाळत घालण्याचा प्रयत्न करता क्षणी त्यांच्या अंगातून वीज प्रवाह सुरू झाला आणि त्या तारेला चिकटून बसल्या. जवळच खेळणाऱ्या अरमान आणि त्याचा भाऊ अर्शद यांनी पटकन आपल्या आईची परिस्थिती ओळखली त्यांना मदतीची गरज आहे हे ओळखून आपल्या जीवाची तमा न बाळगता अरमान तिच्या अंगाला चिकटलेल्या तारेला बाजूला केले आई वीज प्रवाहापासून दूर झाली मात्र अरमान च्या हाताला ती तार चिकटली .त्याने हाताने दूर करताना ती तार त्याच्या पाठीवर पडली व त्याच्या शरीरातून जोरदार वीज प्रवाह सुरू झाला. काही क्षणात अरमान बेशुद्ध झाला त्याचा भाऊ अर्शद त्याला दूर करायचा प्रयत्न करत असताना त्यालाही विजेचा धक्का बसला .अर्शद व त्याच्या आईने आरडाओरडा केला असता जवळचे लोक पळत आले. जवळील एच किराणा दुकानदार बालेखान मुलाणी यांनी विज प्रवाहच्या फ्यूज काढून वीज पुरवठा बंद केला .अरमानला वीज प्रवाहापासून बाजूला केले. स्वतःच्या जीवाची पर्वा न बाळगता अरमानने दाखवलेल्या या शौर्यामुळे त्याच्या आईचे प्राण वाचले. किरकोळ जखमा वगळता अरमान ही या परिस्थितीतून वाचला. त्याच्यावर विटा येथील शासकीय रुग्णालयांमध्ये किरकोळ उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले मात्र अरमान च्या या कामगिरीने मंगरूळ परिसरामध्ये त्याचा गौरव केला जात आहे व सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे .शाळा सुरू झाल्यानंतर अरमान ज्यावेळेला शाळेत आला त्यावेळी अरमानच्या या शौर्य बद्दल शाळेतील शिक्षकांच्या कडून त्याचा गौरव करण्यात आला. तसेच गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्याची राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. विटा खानापूर ची गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी साहेब तसेच विस्ताराधिकारी विकास राजेसाहेब केंद्रप्रमुख अनिता यलमार व मुख्याध्यापक लक्ष्मण निकम यांच्याशी चर्चा केली असता विहित नमुन्यात राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी अरमानच्या नावाची शिफारस प्रस्तावात दाखल करण्याचे नायकवडी साहेबांनी सांगितले तसेच नायकवडी साहेब यांनी शाळेत येऊन स्वतः अरमान व त्याच्या भावाचा गौरव केला. सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास भैया बाबर मंगरूळ गावचे सरपंच पोपट दादा, खानापूर बाजार समितीचे माजी चेअरमन आनंदराव पाटील व ज्येष्ठ नेते रामराव दादा खानापूर पंचायत समितीच्या सभापती मनीषा बागल उपसभापती नलवडे साहेब यांनी देखील अरमान चा गौरव व सत्कार केला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें