सेलू :- श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभी महोत्सवाचा उदघाटन सोहळा (ता.२६) बुधवार रोजी विद्याविहार संकुल येथे पार पडला.
सुरभी महोत्सवाचे उदघाटन उद्घाटक जिल्हा परिषदचे सदस्य मा. राजेन्द्रकाका लहाने यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे, प्रमुख उपस्थिती उपविभागीय पोलीस अधिकारी मा.रेणुका वागळे,प्रमुख पाहुणे म्हणून सेलू नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष मा. प्रभाकर सुरवसे, न.प. सदस्य मा. मारोती चव्हाण,माजी न.प. सदस्य मा. मिलिंद सावंत, दिव्य मराठी तालुका प्रतिनिधी मा. राम सोनवणे, आदरनीय डाॅ. रामराव रोडगे, संस्थेच्या सचिव डाॅ. सौ. सविता रोडगे, सॅनरो एज्युकेअर प्रा ली. चे संचालक डॉ. आदित्य भैया रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा, महादेव साबळे तसेच सर्व घटक संस्थेचे प्राचार्य व मुख्याध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते
सुरभी महोत्सव अंतर्गत स्पोर्ट्स डेच्या कार्यक्रमाची सुरवात ध्वजारोहणाने झाली यावेळी मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वल व प्रतिमा पूजन करण्यात आले.स्पोर्ट्स डे या दिनी घटक संस्थेतील प्रिन्स अकॅडमी, प्रिन्स इंग्लिश स्कुल, ज्ञानतीर्थ विद्यालय, एकात्मिक आदिवासी प्रकल्प, अपूर्वा पॉलीटेकनिक, डॉ. राम रोडगे अध्यापक विद्यालय व महाविद्यालयच्या विध्यार्थी- विद्यार्थिनीनी संचलन, लेझीम. अरेबिक्स, मनोरे कराटे आदी विविध क्रीडा प्रकारचे सादरीकरण केले.
विध्यार्थ्यानी अभ्यासाबरोबरच खेळाला देखील तितकेच महत्व दिले पाहिजे. जेणे करून आपले आरोग्य निरोगी व चांगले राहील.खेळ खेळल्यामुळे विध्यार्थ्यांच्या विचार प्रणालीला चालना मिळते.सुरभी महोत्सव निमित्य विविध क्रीडा प्रकारचे सादरीकरण स्पोर्ट्स दिनी विध्यार्थी करतात. तसेच या पाच दिवसीय कार्यक्रमामध्ये एकापेक्षा एक सांस्कृतिक कार्यक्रम सेलू शहरातील नागरिकांना पाहायला मिळतात. या कार्यक्रमातूनच विध्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा काम पालकाचे असते सतत आपल्या पालकांना नावीन्य पूर्ण व कौशल्ययुक्त शिक्षण देण्याचे काम डॉ. संजय रोडगे हे अविरत आपल्या टीम सहा करतात याचा आम्हाला अभिमान वाटतो. असे राजेंद्र लहाने म्हणाले.
दुबई इथे पार पडलेल्या इंटरनॅशनल स्कुल अवॊर्ड मध्ये सोळा देशातील ११००० शाळांचा
नामाकन मिळाले होते. त्यामध्ये क्यूरीअस किड्स प्ले एजुकेशन सेंटर या प्री स्कुल ला " BEST EMERGING PLAY SCHOOL OF THE YEAR " या अवॊर्डने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल सॅनरो एज्यूकेएरचे चेअरमन डॉ. संजय रोडगे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय ठाकर तर आभार प्रा. अशोक बोडखे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी खुडदूस जुलाहा, रेखा मस्के, नोमान सय्यद, राठोड सर तसेच प्रतिष्ठानच्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें