शिर्डी (प्रतिनिधी)–राजेंद्र दुनबळे
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून समाधी मंदिर सोमवार दिनांक ३१ डिसेंबर २०१८ रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी दिली.
श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त श्रींच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणा-या सर्व भाविकांना श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा व होणा-या गर्दीचे नियोजन योग्य रितीने व्हावे या उद्देशाने सोमवार दिनांक ३१ डिसेंबर २०१८ रोजी श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दिनांक ३१ डिसेंबर रोजीची शेजारती व दिनांक ०१ जानेवारी २०१९ रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही.
यानिमित्ताने दिनांक २२ डिसेंबर ते दिनांक ३१ डिसेंबर २०१८ याकालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये दि.२२ डिसेंबर रोजी सायं.७.३० ते ९.०० यावेळेत व्दारका मंडळी, बेंगलोर, दि.२३ डिसेंबर रोजी सायं.७.०० ते ८.३० यावेळेत मनिषा धिंग्रा, दिल्ली व रात्रौ ८.३० ते ९.४५ यावेळेत रमेश ओबेरॉय, मुंबई, दि.२४ डिसेंबर रोजी सायं.७.०० ते ९.४५ यावेळेत सुबरत, ओडीसा, दि.२५ डिसेंबर रोजी सायं.७.०० ते ९.४५ यावेळेत विनया कुलकर्णी, नाशिक, दि.२६ डिसेंबर रोजी सायं.७.०० ते ९.४५ यावेळेत अनिलकुमार मिस्किन, कर्नाटक, दि.२७ डिसेंबर रोजी सायं.७.०० ते ९.४५ रोजी सुधांशु लोकेगांवकर, शिर्डी, दि.२८ डिसेंबर रोजी सायं.७.०० ते ९.४५ यावेळेत श्रृती कंकण, येवला, दि.२९ डिसेंबर रोजी सायं.७.०० ते ९.४५ यावेळेत रविंद्र पिंगळे, शिर्डी, दि.३० डिसेंबर रोजी सायं.७.०० ते ९.४५ यावेळेत नारायण मुंदडा व सार्थक (आप्पा) गायकवाड, मुंबई आणि दि.३१ डिसेंबर रोजी सायं.७.०० ते ९.३० यावेळेत जगदीश मारुती पाटील, मुंबई व रात्रौ ९.३० ते ११.४५ यावेळेत साई स्वरांजली संगीत संच, नागपूर आदी कलाकारांचे साईभजन संध्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तसेच नाताळ व नवर्षाच्या सुट्टीच्या गर्दीमुळे मंगळवार दिनांक २५ डिसेंबर, सोमवार दिनांक ३१ डिसेंबर व मंगळवार दिनांक ०१ जानेवारी २०१९ रोजी असे ०३ दिवस श्री साईसत्यव्रत पूजा, अभिषेक पूजा बंद राहील याबरोबरच सोमवार दिनांक ३१ डिसेंबर व मंगळवार दिनांक ०१ जानेवारी २०१९ रोजी असे ०२ दिवस वाहन पूजा बंद राहतील. याची सर्व साईभक्तांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही श्रीमती अग्रवाल यांनी केले आहे.
हा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व सर्व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्नशिल आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें