जवाहर मेडिकल जवळ आठवडे बाजाराच्या दिवशी भाजीविक्रेतांना बसण्यास मनाई करावी आणि रस्त्यावरील गतिरोधकांना पांढऱ्या रंगाचे पट्टे द्यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर काळे यांनी मुख्यधिकारी यांना दिले निवेदन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 13 दिसंबर 2018

जवाहर मेडिकल जवळ आठवडे बाजाराच्या दिवशी भाजीविक्रेतांना बसण्यास मनाई करावी आणि रस्त्यावरील गतिरोधकांना पांढऱ्या रंगाचे पट्टे द्यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर काळे यांनी मुख्यधिकारी यांना दिले निवेदन.




शिर्डी प्रतिनिधी :-
कु.किरण जाधव

कोपरगाव शहरात सोमवारी आठवडे बाजार असतो.कोपरगावचा बाजार खुप मोठा बाजार आहे.या बाजारात मालेगाव, येवला,राहता, वेजापुर या ठिकाणाहून व्यापारी व्यापार करण्यासाठी येत असतात. कोपरगाव तालुक्यात ८० गावे असुन बहुतांश शेतकरी कोपरगावच्या बाजारात भाजीपाला विक्री साठी येत असतो.त्यामुळे कोपरगावचा बाजार खुप मोठा आहे.या बाजारामुळे शहरात मोठी वर्दळ असते.कोपरगावातील सावरकर चोक येथील जवाहर मेडिकलच्या बाजूला मुतारी जवळ विविध दुकाने पतसंस्था आहे.त्यामुळे येथे नागरिकांची वर्दळ असते.त्यातच सोमवारच्या दिवशी भाजीपाला विक्रेते याठिकाणी बसतात.त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते.अनेकांची बाचाबाची होवून वाद होतात.यामुळे स्थानिक नागरिकांना व महिलांना याचा त्रास होतो.यामुळे या ठिकाणी भाजीपाला विक्रेता यांना बसण्यास मनाई करावी व त्यांची इतर ठिकाणी व्यवस्था करावी तसेच कोपरगाव शहरात विविध रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात आले आहेत.सदरचे गतिरोधक वाहन चालकांना सहजासहजी दिसत नाही.त्यामुळे या गतिरोधकांवर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर काळे यांनी कोपरगावचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सरोदे यांना निवेदन दिले आहे.सदरचे निवेदन यापूर्वीही तिन महिने अगोधर दिले होते.यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.याचा खुलासा नगरपालिकेने करावा अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें