निळवंडे कामास अडथळा आणणाऱ्यां आ. पिचडांचा जवळके येथे पुतळा दहन . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 24 दिसंबर 2018

निळवंडे कामास अडथळा आणणाऱ्यां आ. पिचडांचा जवळके येथे पुतळा दहन .



 शिर्डी प्रतिनिधी
कु.किरण जाधव.

उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्याना अडथळा आणणाऱ्या आ. वैभव पिचडांवर व काम बंद करणाऱ्या त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी काल निळवंडे कालवा कृती समितीने कोपरगाव तालुक्यातील जवळके चौफुलीवर त्यांच्या प्रतिमेचे दहन केले आहे.
     सदरचे सविस्तर वृत्त असे की,निळवंडे कालवा कृती समितीने मोठा पाठपुरावा करून या प्रकल्पाच्या कालव्यांसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळावा यासाठी केंद्रीय जल आयोगाकडून २०१४ अखेर चौदा मान्यता मिळवल्या होत्या उर्वरित मान्यता, मुंबई उच्य न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जाऊन प्रसिद्ध वकील अजित काळे यांच्या माध्यमातून जनहित याचिका कर्ते विक्रांत काळे व पत्रकार नानासाहेब जवरे यांनी याचिका दाखल करून मिळवल्या आहेत. खंडपीठाने या प्रकल्पाला निधी देण्याचे आदेश २६ ऑक्टोबरला दिलेले आहे.आज निधी शिल्लक असतांना अकोले तालुक्यात काम चालू करण्यास जलसंपदा विभाग चालढकल करीत असून त्यामुळे प्रस्तावित लाभक्षेत्रातील १८२ गावातील शेतकऱ्यांत मोठा असंतोष धुमसत आहे..राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांकडून १५८ कोटींचा निधी प्राप्त केला आहे.गट वर्षीचा ४८ कोटींचा निधी शिल्लक आहे नाबार्डकडून अजून जवळपास शंभर कोटींचा निधी मिळणार आहे व या निधीतून केवळ अकोले तालुक्यातील शुन्य ते १८ कि.मी.या महत्वपूर्ण टप्प्यातील कालवे व नदी नाल्यावरील पूल व तत्सम कामे प्राधान्यक्रमाने करावे अशी मागणी करून त्याचा पाठपुरावा सातत्याने सप्रमाण केला आहे .अकोले तालुक्यातील कालव्यासाठी साधारण पस्तीस वर्षांपूर्वी भूसंपादन करून त्याचा मोबदला त्या शेतकऱ्यांना दिला आहे.त्यांच्या जमिनी गेल्या त्यांचा मोबदला मिळलेला आहे .त्यांना उर्वरित जमिनीस पाणी मिळून त्या बागायती व्हाव्यात यासाठी त्यांच्या मागणीनुसार जलसंपदा विभागाने उच्यस्तरीय कालवे करून त्यांचे शिल्लक क्षेत्राला पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे,त्यांच्या उपसा सिंचन योजनांना मंजुरी दिली आहे.त्यामुळे त्यांचे जवळपास आठ हजार आठशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले आहे.त्यामुळे अकोले तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मिटला असतांना राजकीय पाठिंब्यावर काही असामाजिक तत्वे मुद्दाम काम करण्यास अडथळा आणत होती व जलसंपदा विभाग व संबंधित ठेकेदार यांची अभद्र युती होऊन या अपप्रवृत्तीस पाठबळ पुरवीत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.व किरकोळ विरोध दाखवून काम बंद ठेऊन जलसंपदाचा निधी हडप करण्याचे नसते उद्योग सुरु असल्याची बाब लपून राहिलेली नाही.राज्य सरकारने २फेब्रुवारी २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार  आ. पिचड समर्थकांना पत्र लिहून नवीन प्रकल्पांचे कालवे भूमिगतरित्या करण्याचे निर्देश असल्याचे सांगून जुन्या प्रकल्पाचे कालवे जमिनीवरून घेण्याची तरतूद असल्याचे कळवूनही पिचड जाणीवपूर्वक झोपेचे सोंग घेत आहेत.त्यामुळे हा प्रकल्प ४८ वर्ष संपुनही पूर्ण झाला नाही.आता अधिकचा विलंब शेतकऱ्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काम सुरु करतो असे लेखी आश्वासन कालवा कृती समितीस देऊनही अडीच महिने लोटले आहे तरी या विभागाला या कालव्याचे काम सुरु करण्यास पोलीस बळ मिळाले नाही,त्या नंतरही वेळोवेळी लेखी देऊनही त्याचे पालन केलेले नाही. हा बनाव कृती समितीस लक्षात आल्याने काल निळवंडे कालवा कृती समितीने नगर येथील जलसंपदाच्या औरंगाबाद रोडवरील जलसंपदा अधीक्षक कार्यालयात,त्या नंतर संगमनेर जलसंपदा कार्यालयात १७ नोव्हेम्बर रोजी धरणे आंदोलन  केले होते. त्यानंतर जलसंपदा विभागाने २० नोव्हेम्बर रोजी पोलीस बंदोबस्तात काम चालू करण्याचे आश्वासन दिले होते तथापि अकोलेचे आ. वैभव पिचड यांनी त्यांच्या असंबंधीत  समर्थकांना हाताशी धरून काम बंद पाडले व जलसंपदा व पोलीस प्रशासन हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन उभे राहिले त्यांनी बघ्याची भूमिका घेतली त्याचा काल कृती समितीच्या आंदोलकांनी संगमनेर तालुक्यातील वडझरी बुद्रुक येथे  येथील दोन्ही गावांच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करून तेथे आ. पिचड,व लाभक्षेत्राबाहेर निळवंडेचे पाणी पळविणाऱ्या कोपरगावच्या लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. व काम बंद करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
  सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते कौसर सय्यद,दत्तात्रय थोरात,सोपान थोरात, गोरक्षनाथ थोरात,रामनाथ थोरात,विजय थोरात , एकनाथ थोरात ,विजय शिंदे ,प्रकाश थोरात,आनंदा भडांगे,जनार्धन थोरात, लक्ष्मण थोरात ,गोरक्षनाथ शिंदे,गोरख थोरात,संपत थोरात,सतिश जवरे,अनिल थोरात,चंद्रकांत थोरात,महेश दरेकर,अरूण वाकचौरे,सुखदेव थोरात,भिमराज जवरे,जाफर मनियार,मच्छिंद्र थोरात,आदी प्रमुख मान्यवरांसह जवळके धोडेेवाडी येथील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
सदर प्रसंगी रामनाथ थोरात यांनी आ. पिचड व त्यांचे असंबंधीत कार्यकर्ते त्यांची प्रकल्पात जमीन गेलेली नसतानाही त्या ठिकाणी त्यांनी अवैधरित्या काम बंद केल्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे.तर ज्ञानदेव थोरात यांनी १८२ गावांचे हक्काचे पाणी असतांनाही त्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र आखले जाऊन सदरचे पाणी ज्यांना भांडरदर्याचे पाणी मिळते त्यांच्याच घशात घातले जात असल्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें