शिर्डी प्रतिनिधी :-
कु.किरण जाधव.
कोपरगाव शहरातील टिळकनगर भागात अनेक पोळ बैल सध्या धुडगूस घालत आहे.या बैलाच्या हाणामारी होत असतात. या बैलाच्या झुंजी मुळे रस्ता बंद होवून जातो.अनेक लहान मुले महिलामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.हे पोळ बैल नेहमी धुडगूस घालत आहे.मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात गाडीची नुकसान झाली होती. मोठ्या प्रमाणावर नागरिकांची धावपळ झाली.या बैलांच्या हाणामारी मुळे टिळकनगर मधील रहिवासी जीव मुठीत घेवुन जगत आहे.या बैलाच्या हाणामारी कोणाचा जीव गेल्यास याला कोण जबाबदार असेल असा नागरिकांचा प्रश्न निर्माण झाला आहे.कोपरगाव नगरपालिकेने याकडे त्वरित लक्ष घालावे.अन्यथा मोठा अनर्थ होईल.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें