भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकासाठी फुले दांपत्याला अभिवादनासाठी रॅलीत सहभागी व्हा...... संतोष भाऊ जमदाडे यांचे आवाहन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 23 दिसंबर 2018

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकासाठी फुले दांपत्याला अभिवादनासाठी रॅलीत सहभागी व्हा...... संतोष भाऊ जमदाडे यांचे आवाहन.

सेलूत माळी महासंघाचे संमेलन संपन्न.



सेलू प्रतिनिधी शमशेर खान.


महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्री फुले यांनी अखिल मानव समाजासाठी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली या दिनाचे औचित्य साधून माळी महासंघाच्या वतीने व्यापक संमेलन प्रभाकर इंगळे यांच्या निवास्थानी घेण्यात आले.

 या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माळी महासंघाचे विभागीय अध्यक्ष संतोष भाऊ जमदाडे जालना, गणेश तारसे,  प्रा. आशोक खेत्रे, अँड. काळे मानवत, जिल्हा अध्यक्ष प्रभाकर इंगळे, तालुका अध्यक्ष आसाराम जावळे, तुकाराम गायकवाड, आसाराम कटारे, भगवान रासवे, कोंडीबा भोकरे ,संतोष कटारे, दिनेश उबाळे, चेतक गोरे, गजानन धोत्रे, सोमेश्वर गिराम, भागवत काकडे ,आदींची उपस्थिती होती.

 प्रारंभी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला संतोष भाऊ जमदाडे यांनी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले प्रास्ताविक भाषणातून माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर इंगळे यांनी येथे एक जानेवारीला फुले दांपत्याच्या कार्याला अभिवादन म्हणून भिडे वाडा हे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी माळी समाज बांधवांसह आधी एक जुटी ने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. बहुजन समाज व मानव जातीसाठी फुले दांपत्यांनी अवघे जीवन समर्पित केले म्हणूनच त्यांना अभिवादन करण्यासाठी भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचा लढा तीव्र करण्याचे आव्हान या वेळी करण्यात आले .

विभागीय अध्यक्ष संतोष भाऊ जमदाडे त्यांनी फुले दांपत्याच्या भिडे वाडा येथील जागा सोळा हजार स्क्वेअर फूट होती. आज ती जागा तीन हजार स्क्वेअर फूट झाली आहे. भिडे वाडा क्रांतिकारी भूमी असून येणाऱ्या पिढीला प्रेरणा व मानवतेचा संदेश देण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून माळी समाज एक जानेवारीला भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकासाठी एकत्र येणार आहे तरी सर्व सेलू तालुक्यातील समाज बांधवांनी एक दिवस महापुरुषांसाठी काढावा हे सांगून फुले दांपत्याच्या परिवर्तनवादी कार्याचा सविस्तर आपल्या भाषेतून आढावा घेतला. यावेळी प्रा. आशोक खेत्रे यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या मुलींची शाळा ज्या भिडे वाड्यात भरली त्या वाड्याचा क्रांतिकारी इतिहास व नवा इतिहास घडावयास लावेल ही अपेक्षा विस्तृतपणे सांगितले गणेशराव तारसे  यांनी सामाजिक व सांस्कृतिक, आर्थिक, मानसिक, शैक्षणिक दृष्ट्या समाज संपन्नतेची दिशा आज घेऊ लागला आहे .त्यादृष्टीने एकदिलाने एकत्र येण्याची गरज आज निर्माण झाली आहे. भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी या महापुरुषांच्या आदर्श घेतल्याशिवाय दिशा मिळणे अशक्य असल्याचे सांगून अविनाश भाऊ ठाकरे यांनी माळी महासंघाच्या माध्यमातून समाज जोडण्याचे काम सुरू केले आहे सततचा पाठपुरावा मुळे शासनाने याची गंभीर दखल घेऊन भिडेवाडा स्मारक चा प्रश्न निकाली काढण्याची वेळ आली आहे .माळी समाज महासंघाच्या माध्यमातून संघटनेचे कार्यकर्ते भिडे वाड्याकडे येणाऱ्या एक जानेवारीला भव्य रॅलीचे प्रदर्शन करणार आहे. त्यादृष्टीने सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश इंगळे यांनी केले तर आभार संतोष कटारे यांनी मानले या समारंभात मोठ्या संख्येने माळी समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें