अनेक विधवा - निराधारांना शासकीय अनुदानापासुन वंचितच ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न - आ.अब्दुल सत्तार; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 2 दिसंबर 2018

अनेक विधवा - निराधारांना शासकीय अनुदानापासुन वंचितच ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न - आ.अब्दुल सत्तार;

आमदार आपल्या दारी अभियानात नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या ;

सिल्लोड (प्रतिनिधी)दि 02/12/2018.
वाडी - वस्ती - तांड्यांवरील गोरगरिबांपर्यंत अनेक शासकीय योजना पोहोचतच नसुन अनेक विधवा - निराधारांना शासकीय योजनांपासुन वंचितच ठेवण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु असल्याचे मत माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. सिल्लोड शहरालगतच्या रजाळवाडी - सपकाळ वाडी - पंडित वाडी - कुदळ वाडी, येथील नागरिकांच्या विविध अडी अडचणी समस्या जाणून घेतल्या असता आ.अब्दुल सत्तार बोलत होते.

सिल्लोड शहरात आमदार आपल्या दारी अभियान सुरु असुन रविवार (दि 02)रोजी आ.अब्दुल सत्तार यांनी रजाळवाडी - सपकाळ वाडी - पंडित वाडी - कुदळ वाडी येथील नागरिकांच्या दारोदार जाऊन विविध अडी अडचणी समस्या जाणून घेत घरकुल - रस्ते - पाणी - वीज या मुलभूत सुविधांसह व इतर अनेक समस्यांचे निवारण करण्यात आले . ठिक ठिकाणी माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांचे नागरिकांनी स्वागत केले.
यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड,शांतीलाल अग्रवाल,गटनेते नंदकिशोर सहारे, विठ्ठलराव सपकाळ,रऊफ बागवान,रईस मुजावर पठाण, राजु बागवान, राजरत्न निकम,सत्तार हुसैन,प्रशांत क्षीरसागर, सलिम हुसैन,राजु गौर, सुनिल दुधे, सतिश ताठे,निजाम पठाण, मधूकर बेंडाळे,संजय मुरकुटे,राजेंद्र बन्सोड,दशरथ सुरडकर,कुणाल सहारे, मुश्ताक देशमुख, संजय आरके,मनोहर आरके, अकिल देशमुख,मतीन देशमुख,डाँ.फेरोज पठाण , अमित आरके,हाजी मोहम्मद हनिफ, राजेश्वर आरके, इम्रान कुरैशी,सखाराम अहिरे, शेख आबेद,जितू आरके,अमोल कुदळ,जगन्नाथ कुदळ,फईम पठाण, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
चौकट -- गावठाण डिपी -- पोलची कामे तात्काळ करा...नागरिकांच्या विविध अडी अडचणी समस्या जाणून घेत असतांना अनेक नागरिकांनी गावठाण डिपी -- पोल दुरुस्ती कामांच्या समस्या मांडल्या असता माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिका-यांना वाडी - वस्ती - तांड्यांवरील गावठाण डिपी - पोल दुरुस्ती कामे तात्काळ हाती घेण्याविषयी सुचना दिल्या.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें