सोनपेठ : येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. संतोष रणखांब यांना परभणी येथे होणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद परभणी आयोजित भव्य शिक्षण परिषद व पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना जिल्हास्तरीय पुरस्कार दिनांक २५/१२/२०१८ रोजी श्रीकृष्ण गार्डन परभणी येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यामध्ये सोनपेठ तालुक्यातून उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणारे कै रमेश वरपुडकर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ संतोष रणखांब यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.गोविंद लहाने प्रा.सिद्धार्थ सोनाळे यांच्या हस्ते हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.यावेळी प्राचार्य डॉ वसंत सातपुते,आंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख प्रा.डॉ.मुकुंदराज पाटील, क्रीडा प्रमुख गोविंद वाकणकर,प्रा.अंगद फाजगे,प्रा.डॉ.अशोक चव्हाण, प्रा डॉ. शिवाजी वडचकर, प्रा.पंडित जोंधळे,प्रा.नागनाथ दहिफळे,प्रा. महालिग मेहत्रे प्रा.दिलीप कोरडे, रामेश्वर कदम प्रा.विशाल राठोड, संतुक कुलकर्णी, दत्ता सोनटक्के, चंद्रपाल पटके तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें