दुष्काळी उपाययोजना करा अन्यथा कुठल्याही मंत्र्यांला फिरू देणार नाहीत... शेख राज मनसे जिल्हा अध्यक्ष. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 24 दिसंबर 2018

दुष्काळी उपाययोजना करा अन्यथा कुठल्याही मंत्र्यांला फिरू देणार नाहीत... शेख राज मनसे जिल्हा अध्यक्ष.



सेलू .प्रतिनिधी. शमशेर खान.
 शासनाने परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून तब्बल दोन महिन्याचा कालावधी झाला असून अद्यापर्यंत दुष्काळ उपाययोजना बाबद कसल्याही प्रकारचे नियोजन करण्यात आलेले नाहीत येत्या १५ जानेवारी पर्यंत दुष्काळी उपाय योजना न राबविल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक हि मंत्र्यांला जिंतुर विधानसभेत फिरू देणार नाही, असा ईशारा निवेदनाद्वारे जिल्हा अध्यक्ष शेख राज यांनी दिला.

उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात खलील मागण्या करण्यात आलेले आहेत जनावरांसाठी चारा छावण्या तात्काळ सुरू करण्यात यावे, दोनी तालुक्यात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय करावी, शेतकऱ्यांना विशेष सहकार्य अंतर्गत हेक्टरी ५०,००० ची मदत तात्काळ देण्यात यावी, तात्काळ पीक विमा देण्यात यावा,तसेच पिकं कायदया नुसार विम्याचे संरक्षण २५%ऍडव्हान्स रक्कम तात्काळ देण्यात यावी,
विद्यार्थीची शैक्षणिक फिस माफ करावी, स्वत धान्य उपलब्ध करून देण्यात यावी, नादुरुस्त विंधन विहरी तात्काळ दुरुस्ती करावी, तसेच संपूर्ण जिंतुर तालुका  दुष्काळग्रस्त जाहीर करावा, नसता मनसे तर्फे १५ जानेवारी नंतर एक ही मंत्री ला फिरु देणार नाही असा ईशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष, शेख राज, गुलाबराव रोडगे, निजलींगअप्पा तरवडगे, गणेश भिसे,गणेश निवळकर, रामभाऊ मोगल, प्रभुराज तेवर, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

1 टिप्पणी: