विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांचे हस्ते सन्मान वितरण.
सेलू (प्रतिनिधी)
विभागीय आयुक्त डॉ पुरूषोत्तम भापकर यांनी परभणी जिल्ह्यातील गुणवत्तेचे शिलेदार म्हणून निवड केलेल्या यादीमध्ये डासाळा येथील केंद्रीय जि.प.शाळेचे मुख्याध्यापक मधुकर काष्टे यांची निवड झाली असुन आयुक्त डॉ भापकर यांनी मुख्याध्यापक काष्टे यांचा २ डिसेंबर रोजी सन्मान केला आहे.
काम करत रहा तुच्या कामाची स्पंदने ही सर्व क्षेत्रात पसरतात याची प्रचिती औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयात २डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील गुणवंत शिक्षकांचा गुणवत्तेचे शिलेदार सन्मान सोहळ्यात आली.
महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील मुलांच्या भविष्यात उद्याची मोठमोठी स्वप्न भरण्याचे काम करणाऱ्या ,उत्तम अशा शिक्षकांची गुणवत्तेचे शिलेदार म्हणून तात्कालीन शिक्षण आयुक्त तथा विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी निवड करून २ डिसेंबर रोजी या सर्व गुणवत्तेच्या शिलेदारांना सन्मानित करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली .या सोहळ्यात डासाळा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मधुकर काष्टे यांनाही सन्मानित करण्यात आले. साने गुरुजी कथामाला,नवोदय पुर्व सराव परीक्षा,विविध कलाकृतीसाठी विद्यार्थ्यांना कृतीयुक्त मनोरंजन शाळा ,विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांचे नाविण्यपूर्ण यश व उत्तम प्रशासन या सर्व बाबीचा आढावा घेऊन मुख्याध्यापक मधुकर काष्टे यांची या सन्मानासाठी निवड झाली आहे .या सन्मानाबद्दल मधुकर काष्टे यांचा डासाळा येथील केंद्रीय प्रशालेत सदाशिव मुळी ,प्रविण कुलकर्णी, किर्ती अंबेकर ,यशोदा मचाले पपीता मेश्राम ,ज्योती भागवत ,सारीका दवणे यांच्या उपस्थीतीत सत्कार करण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें