तेलंगणा विधानसभा बरखास्त करत नव्याने निवडणुकांना सामोरे जाऊन एकहाती सत्ता मिळवलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी राज्याचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या साध्या समारंभात राज्यपाल ई. एस. एल नरसिम्हा यांनी राव यांना शपथ दिली.
राव यांच्यासोबत विधानपरिषद सदस्य महंमद मेहमूद अली यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. केसीआर यांनी बरखास्त केलेल्या मंत्रीमंडळात अली उप मुख्यमंत्री होते. राव यांची काल नवनिर्वाचित आमदारांकडून विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली होती.
नुकत्याच पार पडलेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत केसीर यांच्या टीआरएसने भाजप तसेच काँग्रेस नेतृत्व करत असलेल्या प्रजा कुटमीचा धुव्वा उडवत सत्ता कायम राखली. ११९ सदस्य संख्या असलेल्या तेलंगणा विधानसभेत टीआरएसचे ८८ सदस्य आहेत. प्रजा कुटमीला २१ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपची एका जागेवर बोळवण झाली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें